Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 28

90 Mantra
20/28
Devata- इन्द्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
सि॒ञ्चन्ति॒ परि॑ षिञ्च॒न्त्युत्सि॑ञ्चन्ति पु॒नन्ति॑ च।सुरा॑यै ब॒भ्वै्र मदे॑ कि॒न्त्वो व॑दति कि॒न्त्वः॥२८॥

सि॒ञ्चन्ति॒। परि॑। सि॒ञ्च॒न्ति॒। उत्। सि॒ञ्च॒न्ति॒। पु॒नन्ति॑। च॒। सुरा॑यै। ब॒भ्र्वै। मदे॑। कि॒न्त्वः। व॒द॒ति॒। कि॒न्त्वः ॥२८ ॥

Mantra without Swara
सिञ्चन्ति परि षिञ्चन्त्युत्सिञ्चन्ति पुनन्ति च । सुरायै बर्भ्वै मदे किन्त्वो वदति किन्त्वः ॥

सिञ्चन्ति। परि। सिञ्चन्ति। उत् । सिञ्चन्ति। पुनन्ति। च। सुरायै। बभ्वै्र। मदे। किन्त्वः। वदति। किन्त्वः॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो माणूस (बभ्र्वै) बळ प्राप्तीसाठी (सुरायै) सोम औषधी आणि (मदे) आनन्ददायक अन्य महौषधीचा रस (सिञ्चन्ति) जाठराग्नीवृद्धीसाठी सेवन करतात (परि, सिञ्चन्ति) सर्व प्रकारे वा विविध रूपाने त्या रसांचे पान करतात (रसांचे वेगवेगळे प्रकार तयार करतात आणि (उत्सिञ्चन्ति) उत्तमरूपाने सेवन करतात व अशा प्रकारे (पुनन्ति) पवित्र होतात, तेच लोक शारीरिक व आत्मिक शक्ती प्राप्त करतात. या उलट जे लोक (औषधीबद्दल) (किन्त्वः) ‘हे काय आहे? ह्याने काय होणार आहे?` अथवा (किन्त्वः) ‘ह्याने काय होणार आहे?` असे (वदन्ति) म्हणतात (म्हणजे औषधीविषयी अविश्वास करतात वा व्यर्थ नाना शंका करीत बसतात) ती शंकेखोर माणसें काही प्राप्त करू शकत नाहीत. (औषधी सेवना सोबत त्यावर आणि वैद्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे) ॥28॥
Essence
भावार्थ - जे लोक अन्न (औषधी ) आदी पदार्थ स्वच्छ करून आणि सुसंस्कारित करून, त्यामधे उत्तम (पुष्टिकर स्वादिष्ट) रस मिसळून त्या पदार्थांचे सेवन करतात, आहार-विहार व खान-पान व्यवस्थित ठेवतात, ते पुष्कळ सुख मिळवितात. जो अज्ञानी माणूस असे करीत नाही. (अस्वच्छ, शिळे आदी पदार्थ खातात-पितात, ते बळ, बुद्धि गमावून बसतात आणि नेहमी दुःखातच निमग्न राहतात. ॥28॥
Subject
आता पुढील मंत्रात विद्वानांविषयी व शरीराविषयी -