Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 27

90 Mantra
20/27
Devata- सोमो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒ꣳशुना॑ ते अ॒ꣳशुः पृ॑च्यतां॒ परु॑षा॒ परुः॑।ग॒न्धस्ते॒ सोम॑मवतु॒ मदा॑य॒ रसो॒ऽअच्यु॑तः॥२७॥

अ॒ꣳशुना॑। ते॒। अ॒ꣳशुः। पृ॒च्य॒ता॒म्। परु॑षा। परुः॑। ग॒न्धः। ते॒। सोम॑म्। अ॒व॒तु॒। मदा॑य। रसः॑। अच्युतः॑ ॥२७ ॥

Mantra without Swara
अँशुना तेऽअँशुः पृच्यताम्परुषा परुः । गन्धस्ते सोममवतु मदाय रसोऽअच्युतः ॥

अꣳशुना। ते। अꣳशुः। पृच्यताम्। परुषा। परुः। गन्धः। ते। सोमम्। अवतु। मदाय। रसः। अच्युतः॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, (ते) आपल्या (अशुना) (शरीराच्या एका) भागाशी (अंशुः) दुसरा भाग (मिळून असावा) तसेच आपल्या (परुषा) मर्मस्थानांशी (लिंग, गुदा, कंठ आदी) (परुः) दुसरे मर्मस्थान (पृच्यताम्‌) मिळून असावे (शरीरातील सर्व अवयव व्यवस्थितपणे असावेत की ज्यायोगे) (ते) आपले (अच्युतः) नाशरहित (गंधः) आणि (रसः) रस वा सार (मदाय) आनन्दप्राप्तीसाठी (सोमम्‌) ऐश्वर्याचे (अवतु) रक्षण करोत (आपल्या शरीरातील गंध, स्पर्श, रस आदी ज्ञान अखंड व अक्षत असावेत की ज्यायोगे आपल्या ज्ञानरूप संपत्तीची रक्षा होईल.) ॥27॥
Essence
भावार्थ - जेव्हां ध्यानावस्थित मनुष्याचे मन आणि इतर इंद्रियें व प्राण परमेश्वरात (त्याच्या ध्यानात) स्थिर होतात, तेंव्हां तो साधक नित्यानंद अनुभवतो. ॥27॥
Subject
पुनश्च, तोच विषय -