Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 2

90 Mantra
20/2
Devata- सभोशो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
निष॑साद धृ॒तव्र॑तो॒ वरु॑णः प॒स्त्यास्वा। साम्रा॑ज्याय सु॒क्रतुः॑। मृ॒त्योः पा॑हि वि॒द्योत् पा॑हि॥२॥

नि। स॒सा॒द॒। धृ॒तव्र॑त॒ इति॑ धृ॒तऽव्र॑तः। वरु॑णः। प॒स्त्या᳕सु। आ। साम्रा॑ज्या॒येति॒ साम्ऽरा॑ज्याय। सु॒क्रतु॒रिति॑ सु॒ऽक्रतुः॑। मृ॒त्योः। पा॒हि॒। वि॒द्योत्। पा॒हि॒ ॥२ ॥

Mantra without Swara
निषसाद घृतव्रतो वरुणः पस्त्यास्वा । साम्राज्याय सुक्रतुः । मृत्योः पाहि विद्योत्पाहि॥

नि। ससाद। धृतव्रत इति धृतऽव्रतः। वरुणः। पस्त्यासु। आ। साम्राज्यायेति साम्ऽराज्याय। सुक्रतुरिति सुऽक्रतुः। मृत्योः। पाहि। विद्योत्। पाहि॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांचे वा सैनिकांचे वचन) हे सभापती, आपण (सुक्रतुः) श्रेष्ठ विचार आणि उत्तम कर्म करणारे आहात. (धृतव्रतः) सत्याने वागणारे असून आपण (वरूणः) उत्तम स्वभावाचे आहात. (आपणास विनंती की आपण) (साम्राज्याय) समस्त भूमंडळावर चक्रवर्ती राज्याची स्थापना करण्यासाठी (पस्त्यासु) न्यायमंदिरात (आ, नि, षसाद) सदा उपस्थित रहा. तसेच आपण आम्हा वीर सैनिकांची व प्रजाजनांची (मृत्योः) मृत्यूपासून (पाहि) रक्षा करा. (विद्योत्‌) प्रकाशमान आग्नेयादी अस्त्राद्वारे (पाहि) आमचे रक्षण करा. ॥2॥
Essence
भावार्थ - जो न्यायाधीश वा सभापती धर्माप्रमाणे वागणारा आणि धार्मिक गुण, कर्म, स्वभाव असणारा असतो, तो जगात चक्रवर्ती साम्राज्याची स्थापना करण्यात आणि आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात समर्थ होतो, इतर कोणीही असा होऊ शकत नाही. ॥2॥
Subject
पुन्हा तोच विषय -