Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 11

90 Mantra
20/11
Devata- उपदेशका देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
त्र॒या दे॒वा एका॑दश त्रयस्त्रि॒ꣳशाः सु॒राध॑सः। बृह॒स्पति॑पुरोहिता दे॒वस्य॑ सवि॒तुः स॒वे। दे॒वा दे॒वैर॑वन्तु मा॥११॥

त्र॒याः। दे॒वाः। एका॑दश। त्र॒य॒स्त्रि॒ꣳशा इति॑ त्रयःऽत्रि॒ꣳशाः। सु॒राध॑स॒ इति॑ सु॒ऽराध॑सः। बृह॒स्पति॑पुरोहिता॒ इति॒ बृह॒स्पति॑ऽपुरोहिताः। दे॒वस्य॑। स॒वि॒तुः। स॒वे। दे॒वाः। दे॒वैः। अ॒व॒न्तु॒। मा॒ ॥११ ॥

Mantra without Swara
त्रया देवाऽएकादश त्रयस्त्रिँशाः सुराधसः । बृहस्पतिपुरोहिता देवस्य सवितुः सवे । देवा देवैरवन्तु मा ॥

त्रयाः। देवाः। एकादश। त्रयस्त्रिꣳशा इति त्रयःऽत्रिꣳशाः। सुराधस इति सुऽराधसः। बृहस्पतिपुरोहिता इति बृहस्पतिऽपुरोहिताः। देवस्य। सवितुः। सवे। देवाः। देवैः। अवन्तु। मा॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या जगात) (त्रयाः) तीन प्रकारचे (देवाः) दिव्यगुणधारक (असे पदार्थ आहेत) या (बृहस्पतिपुरोहिताः) सर्वांमधे मोठ्यामोठ्यांचे पालन करणारा सुर्य प्रथम आहे. या शिवाय (सुराधसः) ज्यांमुळे कार्यांची सिद्धी चांगल्याप्रकारे होते असे (एकादश) अकरा आणि (त्रयस्त्रिंशा) तेहतीस दिव्यगुणधारक पदार्थ (सवितुः) सर्व जगाची उत्पत्ती करणाऱ्या (देवस्य) कीर्तिमान परमेश्वराने (सवे) उत्पन्न केलेल्या या परमैश्वर्ययुक्त जगात आहेत. त्या (देवैः) पृथ्वी आदी तेहतीस पदार्थांसह (देवाः) विद्वानजनांनी (मा) माझे (उपदेशकाचे, सर्वांना ज्ञान देणाऱ्याचे) (अवन्तु) रक्षण करावे (ही माझी अभिलाषा आहे) ॥11॥
Essence
भावार्थ - पृथ्वी, जल, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि नक्षत्र हे आठ (पदार्थ) प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कर्म, कृकल, देवदत्त, धनंजय व अकरावा जीवात्मा, याशिवाय बारा महिने, विद्युत आणि यज्ञ या एकूण तेहतीस दिव्यगुण धारक पृथ्वी आदी पदार्थांच्या गुणांचा, कर्म (कार्य) आणि स्वभाव यांविषयी उपदेश देऊन जे उपदेशक सर्व मनुष्यांचे कल्याण करतात, तेच खऱ्या अर्थाने सर्वांचे उपकारक आहेत ॥11॥
Subject
आता उपदेशकांविषयी -