Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 1

90 Mantra
20/1
Devata- सभोशो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- द्विपदा विराड गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
क्ष॒त्रस्य॒ योनि॑रसि क्ष॒त्रस्य॒ नाभि॑रसि। मा त्वा॑ हिꣳसी॒न्मा मा॑ हिꣳसीः॥१॥

क्ष॒त्रस्य॑। योनिः॑। अ॒सि॒। क्ष॒त्रस्य॑। नाभिः॑। अ॒सि॒। मा। त्वा॒। हि॒ꣳसी॒त्। मा। मा॒। हि॒ꣳसीः॒ ॥१ ॥

Mantra without Swara
क्षत्रस्य योनिरसि क्षत्रस्य नाभिरसि । मा त्वा हिँसीन्मा मा हिँसीः ॥

क्षत्रस्य। योनिः। असि। क्षत्रस्य। नाभिः। असि। मा। त्वा। हिꣳसीत्। मा। मा। हिꣳसीः॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांनी वा सेवकांची उक्ती) हे सभापती राजा, ज्याअर्थी तू (क्षत्रस्य) या राज्याच्या (योनिः) आधार वा अस्तित्वाचे कारण (असि) आहेस (तुझ्यावर हे राज्य अवलंबून आहे) आणि ज्या अर्थी तू (क्षत्रस्य) या राजवंशाच्या (नाभिः) जीवनाचा हेतू (असि) आहेस, (त्या अर्थी तुला प्रार्थना करीत आहोत की) (त्वा) तुला मारण्यात कधी कोणी ही (मा. हिंसीत्‌) समर्थ होऊ नये. तसेच तू देखील (मा) मला सेवकाला (वा इतर प्रजाजनांना) (मा, हिंसीः) मारू नकोस. (आपण दोघांनी एकमेकाची हानी कदापी करू नये. एकमेकाचे सदा रक्षण करावे.) ॥1॥
Essence
भावार्थ - स्वामी आणि सेवक (तसेच प्रजाजन) यांनी अशी प्रतिज्ञा करावी की राजपुरूषांनी प्रजाजनांचे आणि प्रजाजनांनी राजपुरूषांचे निरंतर रक्षण करावे की ज्यायोगे सर्वांच्या सुखाची वृद्धी होईल. ॥1॥
Subject
आता विसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या आरंभी राजधर्म विषयीं वर्णन केले आहे.