Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 5

34 Mantra
2/5
Devata- यज्ञो देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
स॒मिद॑सि॒ सूर्य्य॑स्त्वा पु॒रस्ता॑त् पातु॒ कस्या॑श्चिद॒भिश॑स्त्यै। स॒वि॒तुर्बा॒हू स्थ॒ऽऊर्ण॑म्रदसं त्वा स्तृणामि स्वास॒स्थं दे॒वेभ्य॒ऽआ त्वा॒ वस॑वो रु॒द्राऽआ॑दि॒त्याः स॑दन्तु॥५॥

स॒मिदिति॑ स॒म्ऽइत्। अ॒सि॒। सूर्य्यः॑। त्वा॒। पु॒रस्ता॑त्। पा॒तु॒। कस्याः॑। चि॒त्। अ॒भिश॑स्त्या॒ इत्य॒भिऽश॑स्त्यै। स॒वि॒तुः। बा॒हूऽइति॑ बा॒हू। स्थः॒। उर्ण॑म्रदस॒मित्यूर्ण॑ऽम्रदसम्। त्वा॒। स्तृ॒णा॒मि॒। स्वा॒स॒स्थमिति॑ सुऽआ॒स॒स्थम्। दे॒वेभ्यः॑। आ। त्वा॒। वस॑वः। रु॒द्राः। आ॒दि॒त्याः स॒द॒न्तु॒ ॥५॥

Mantra without Swara
समिदसि सूर्यस्त्वा पुरस्तात्पातु कस्याश्चिदभिशस्त्यै । सवितुर्बाहू स्थः ऽऊर्णम्रदसन्त्वा स्तृणामि स्वासस्थन्देवेभ्यऽआ त्वा वसवो रुद्राऽआदित्याः सदन्तु ॥

समिदिति सम्ऽइत्। असि। सूर्य्यः। त्वा। पुरस्तात्। पातु। कस्याः। चित्। अभिशस्त्या इत्यभिऽशस्त्यै। सवितुः। बाहूऽइति बाहू। स्थः। उर्णम्रदसमित्यूर्णऽम्रदसम्। त्वा। स्तृणामि। स्वासस्थमिति सुऽआसस्थम्। देवेभ्यः। आ। त्वा। वसवः। रुद्राः। आदित्याः सदन्तु॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (चित्) कोणी माणूस योग्य पद्धती आणि कियांद्वारे पदार्थांना सुरक्षित करून आनंदात राहतो. तसेच वसंतऋतूत वृक्ष-वनस्पती आदी उत्तम प्रकारे विकसित होत असल्याप्रमाणे (समित्) हा यज्ञ देखील विकास (असि) पावतो. (त्वा) त्या प्रकाशित यज्ञाला (सूर्य्य) ऐश्‍वर्यकारक सूर्य (कस्या:) सर्व पदार्थांच्या गुणांना (अभिशस्त्यै) प्रकट करण्याकरिता (पुरस्तात्) आधीपासूनच त्या पदार्थांचे (पातु) रक्षण करीत असतो. (समितु:) सूर्याचे जे (बाहू) बल आणि प्रभाव (स्थ:) आहे, त्याद्वारे हा यज्ञ विस्तार व विकास पावतो. (त्वा) या यज्ञाद्वारे (ऊर्णम्रदसम्) सुख-प्राप्तीच्या मार्गात येणार्‍या विघ्नं यांचा विनाश करण्यासाठी (स्वासस्थम्) अंतरिक्ष रूप श्रेष्ठ आसनावर अधिष्ठित होणार्‍या यशाला (वअव:) अग्नी आदी आठ वसु म्हणने अग्नी, पृथ्वी, वायु, अन्तरिक्ष, सूर्य, प्रकाश, चन्द्र आणि तारागण हे आठ वसु (रूद्रा:) प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग,कर्म, कृकल, देवदत्त, धनंजय आणि जीवात्मा हे अकरा रूद्र आणि (आवित्या:) वर्षाचे बारा बहिने, (सदन्तु) (त्या यज्ञास) प्राप्त करतात. (त्वा) त्या (ऊर्णग्रदसम्) सुखाची अत्यंत वृद्धी करणार्‍या (खासस्थम्) अंतरिक्षात स्थिर होणार्‍या यज्ञाला मीही सुखाच्या तसेच दिव्य गुणांच्या प्राप्तीकरिता (आस्तृणामि) उत्तम यज्ञ-सामग्रीद्वारे अच्छादित करून सिद्ध करून ठेवतो. ॥5॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकाराचा प्रयोग केला आहे. ईश्‍वराने सर्व मनुष्यांना उपदेश केला आहे की मनुष्यांनी वसु, रूद्र आणि आदित्य या पदार्थांपासून मनुष्यांना जे जे लाभ घेता येतील ज्या ज्या कार्यांची सिद्धी होत असेल, सर्व जीवांच्या पालन-कल्याणासाठी सर्वानी ते ते सर्व लाभ नित्य घ्यावेत. ज्यापदार्थांचे अग्नीमधे हवन केले जाते. ते पदार्थ सूर्यास आणि वायूस प्राप्त होतात ते सूर्य आणि वायू त्या छिन्न झालेल्या सूक्ष्मरूप पदार्थांना पुन्हा पृथ्वीवर सोडतात. या मुळे या भूमीमध्ये दिव्य औषधी आदी पदार्थ उत्पन्न होतात. आणि सर्व जीवांना नित्य सुख मिळते, यासाठी सर्व मनुष्यांनी सदैव यज्ञाचे अनुष्ठान करावे. ॥5॥
Subject
पुढील मंत्रात यज्ञाच्या साधनांविषयी उपदेश केला आहे-