Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 4

34 Mantra
2/4
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
वी॒तिहो॑त्रं त्वा कवे द्यु॒मन्त॒ꣳ समि॑धीमहि। अग्ने॑ बृ॒हन्त॑मध्व॒रे॥४॥

वी॒तिहो॑त्र॒मिति॑ वी॒तिऽहो॑त्रम्। त्वा॒। क॒वे॒। द्यु॒मन्त॒मिति॑ द्यु॒ऽमन्त॒म्। सम्। इ॒धी॒म॒हि॒। अग्ने॑। बृ॒हन्त॑म्। अ॒ध्व॒रे ॥४॥

Mantra without Swara
वीतिहोत्रन्त्वा कवे द्युमन्तँ समिधीमहि । अग्ने बृहन्तमध्वरे ॥

वीतिहोत्रमिति वीतिऽहोत्रम्। त्वा। कवे। द्युमन्तमिति द्युऽमन्तम्। सम्। इधीमहि। अग्ने। बृहन्तम्। अध्वरे॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (कवे) सर्वज्ञ परमेश्‍वरा, प्रत्येक पदार्थात विद्यमान असणार्‍या व त्याचे ज्ञान असणार्‍या (अग्नी) हे ज्ञानरूप परमेश्‍वरा, आम्ही (अध्वरे) सर्वांशी मैत्रीभाव ठेवण्यात सफल होण्यासाठी (बृहन्तम्) सर्वांसाठी महान व अत्यंत सुखाची वृद्धी करणार्‍या तुला (द्युमन्तम्) अत्यंत प्रकाशमान (वीतिहोत्रम्) व अग्निहोत्र आदी यज्ञांचे ज्ञान देणार्‍या (त्वा) तुझी (समिधीमहि) उत्तम प्रकारे वंदना-प्रार्थना करतो. हा या मंत्राचा पहिला अर्थ झाला (अध्वरे) अहिंसनीय म्हणजे ज्याचा कधीही त्याग करूं नये अशा त्या उत्तम यज्ञात (वीतिहोत्रम्) पदार्थाच्या प्राप्ती करिता ज्या मध्ये अग्निहोत्र आदी क्रिया संपन्न केल्या जातात, अशा (द्युमन्तम्) अत्यंत प्रचंड ज्वालायुक्त (बृहन्तम्) महान् कार्यांत यश देणार्‍या व (कवे) पदार्थांमध्ये क्रमाक्रमाने अथवा केव्हां केव्हां प्रकट होऊन दृष्टीगोचर होणार्‍या (त्वा) त्या (अग्ने) भौतिक अग्नीला आम्ही (समाधीमहि) चांगल्या प्रकारे प्रज्वलित करतो. ॥4॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. जगामधे क्रिया करण्यासाठी जी साधने आहेत व त्या क्रिया आणि साधनांद्वारे उत्पन्न होणारे जे पदार्थ आहेत, त्या सर्वांची रचना ईश्‍वरानेच केली असून तोच त्या पदार्थांना धारण करून विद्यमान आहे. मनुष्यांसाठी हेच उचित की त्या पदार्थांच्या सहाय्याने त्यांचे गुण जाणून घ्यावेत आणि उत्तम क्रिया-प्रक्रियांद्वारे अनेक प्रकारे लाभ घ्यावेत. ॥4॥
Subject
पुढील मंत्रात ‘अग्नी’ या शब्दाद्वारे पूर्वोक्त दोन अर्था विषयी सांगितले आहे -