Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 34

34 Mantra
2/34
Devata- आपो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भूरिक् उष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
ऊर्जं॒ वह॑न्तीर॒मृतं॑ घृ॒तं पयः॑ की॒लालं॑ परि॒स्रु॑तम्। स्व॒धा स्थ॑ त॒र्पय॑त मे पि॒तॄन्॥३४॥

ऊर्ज॑म्। वह॑न्तीः। अ॒मृत॑म्। घृ॒तम्। पयः॑। की॒लाल॑म्। प॒रि॒स्रुत॒मिति॑ परि॒ऽस्रुत॑म्। स्व॒धाः। स्थ॒। त॒र्पय॑त। मे॒। पि॒तॄन् ॥३४॥

Mantra without Swara
ऊर्जँवहन्तीरमृतन्घृतम्पयः कीलालम्परिस्रुतम् । स्वधा स्थ तर्पयत मे पितऋृन् ॥

ऊर्जम्। वहन्तीः। अमृतम्। घृतम्। पयः। कीलालम्। परिस्रुतमिति परिऽस्रुतम्। स्वधाः। स्थ। तर्पयत। मे। पितॄन्॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे पुत्रादी लेकरांनो, तुम्ही (मे) माझ्या (पितृन्) वर सांगितलेल्या गुणांनी युक्त अशा पितरांना (ऊर्जम्) अनेक प्रकारच्या उत्तम रस (वहन्ती) आनंददायी स्वादिष्ट जल (अमृतम्) रोगनिवारक औषधी आणि मिष्टान्नादी पदार्थ (पव:) दूध (घृतम्) तूप (कीलालम्) उत्तम रीत्या शिजवलेले पक्व अन्न तसेच (परिम्रुतम्) ज्यातून रस टपकत आहे, अशी फळें देऊन (तपर्यत) तृप्त करा. (स्वधा:) परधनाचा त्याग करून स्वत:च्या स्व श्रम व पुरूषार्थाने मिळविलेल्या धनाचे सेवन करणारे (स्थ) व्हा. ॥34॥
Essence
भावार्थ - ईश्‍वर आज्ञा करीत आहे की सर्व मनुष्यांनी आपल्या पुत्रांना व सेवकांना आदेश देऊन सांगावे की तुम्ही आमच्या पितरांना म्हणजे पिता-माता आणि विद्यादान करणार्‍या लोकांची अत्यंत आनंदाने सेवा करावी. त्या पूजनीय मंडळीनी आमच्या तुमच्या लहानपणी आणि विद्यादानाच्या कामी आमचे तुमचे पालन-पोषण केले आहे. आम्ही देखील त्यांनी केल्याप्रमाणे सर्वकाळी त्यांचा सत्कार व सेवा करावी, यासाठी की त्यामुळे आमच्या जीवनात विद्यानाश व कृतघ्नता आदी दोष कदापी प्राप्त होऊ नये. ॥34॥
Subject
कोणकोणत्या पदार्थांनी पितरांचा सत्कार करावा, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -
Footnote
ईश्‍वराने या दुसर्‍या अध्यायात ज्या ज्या गोष्टींचे पालन-सेवन करण्यास आज्ञा केली आहे, त्या गोष्टी खालील प्रमाणे आहेत-यज्ञवेदी निर्माण व यज्ञासाठी आवश्यक साधनांची व्यवस्था, यज्ञाचे लाभ, गमन व साधन, सामग्री - धारण, अग्नीच्या दूतत्व गुणांचे प्रकटन, आत्मा व इंन्दियादी पदार्थांची शुद्धी, सुखभोग, वेदांचा प्रकार, पुरूषार्थाचे महत्त्व, युद्धात शत्रूंवर विजय मिळविणे, शत्रूंचे निवारण, द्वेषाचा त्याग, अग्नी आदी पदार्थांचा यान-वाहनादीत प्रयोग, पृथ्वी आदी पदार्थापासून योग्य लाभ/उपयोग घेणें, ईश्‍वराविषयी प्रीती, सद्गुणांचा विकास आणि सर्वांची उन्नती करणे, वेद शब्दार्थाचा अर्थ, वायू आणि अग्नी आदी पदार्थाना परस्पर मिश्रित करणे, पुरूषार्थ अंगीकारणे, उत्तमोत्तम पदार्थांचा स्वीकार, यज्ञात आहुत पदार्थांचे लोकांत जाणे व तेथून परत येणे, स्वयंभू शब्दाचे वर्णन, गृहस्थांची कर्तव्य-कर्मे, सत्याचरण, अग्नीत होम करणे, दुष्टांचे निवारण आणि सेवनीय वस्तूंचे सेवन, हे सर्व कर्म करण्याचे आदेश ईश्‍वराने दिले आहेत, त्यांचे सेवन-पालन मनुष्यांनी अत्यंत प्रेमाने करावे. प्रथम अध्यायाचा अर्थ, जाणून द्वितीय अध्यायाच्या अर्थाची संगती या अध्यायासह लावावी. ॥^इथे द्वितीय अध्याय समाप्त होत आहे.