Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 31

34 Mantra
2/31
Devata- पितरो देवताः Rishi- वामदेव ऋषिः Chhand- बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
अत्र॑ पितरो मादयध्वं यथाभा॒गमावृ॑षायध्वम्। अमी॑मदन्त पि॒तरो॑ यथाभा॒गमावृ॑षायिषत॥३१॥

अत्र॑। पि॒त॒रः॒। मा॒द॒य॒ध्व॒म्। य॒था॒भा॒गमिति॑ यथाऽभा॒गम्। आ। वृ॒षा॒य॒ध्व॒म्। वृ॒षा॒य॒ध्व॒मिति॑ वृषऽयध्वम्। अमी॑मदन्त। पि॒तरः॑। य॒था॒भा॒गमिति॑ यथाऽभा॒गम्। आ। अ॒वृ॒षा॒यि॒ष॒त॒ ॥३१॥

Mantra without Swara
अत्र पितरो मादयध्वँयथाभागमा वृषायध्वम् । अमीमदन्त पितरो यथाभागमा वृषायिषत ॥

अत्र। पितरः। मादयध्वम्। यथाभागमिति यथाऽभागम्। आ। वृषायध्वम्। वृषायध्वमिति वृषऽयध्वम्। अमीमदन्त। पितरः। यथाभागमिति यथाऽभागम्। आ। अवृषायिषत॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (पितर:) स्वत: उत्तम विद्यावान असलेल्या आणि इतरांना उत्तम ज्ञान व उपकारक विद्या देऊन पालन करणार्‍या विद्वज्जनहो (अत्र) आमच्या या सत्कार-समारोहात किंवा सत्कार-स्थानात (यथाभागम्) सत्कारासाठी विविध पदार्थांचा (आवृषायवाम्) तुम्ही स्वीकार करा. ज्या प्रमाणे बैल अत्यंत आनंदीत होऊन गवत-चारा खातात, तद्वत तुम्ही आमच्या सत्कार-सन्मानाचा सानंद स्वीकार करा. आणि (मादयध्वम्) त्यास गोड मानून घ्या. आम्ही आपापल्या ज्या ज्या बुद्धी व इच्छेप्रमाणे तुमच्याकडे येऊ, तसे तुम्ही (यथाभागम्) यथोचित गुण व ज्ञान देणारे व्हा. (आवृषादित) विद्या आणि धर्माचे शिक्षण देणारे व्हा व (अमीमदन्त) सर्व ज्ञानार्थी सुखार्थींना आनंदीत करा.
Essence
भावार्थ -ईश्‍वर आज्ञा करीत आहे की माणसांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करावी व अन्यही आगत धार्मिक सज्जन विद्वानांनी अवश्य सेवा करावी. अशा वेळी प्रार्थना करून या प्रकारें त्यांना विनंती करावी ‘हे पितरगण, आपले शुभागमन हे आमचे परम भाग्य आहे. या आणि आम्ही आमच्या शक्तिसामर्थ्याप्रमाणे जे भोग्य पदार्थ, आसन आदी आपणांस देत आहोत, त्याचा स्वीकार करा आणि ते गोड मानून घ्या. तसेच जे पदार्थ आपणांस प्रिय आहेत, ते आणण्यासाठी आज्ञा करा. कारण की सत्कारामुळे आपण प्रसन्न होऊन आमच्या प्रश्‍नांना उत्तरें देऊन आमच्या ज्ञानात वृद्धी कराल. तसेच आम्हांला स्थूल आणि सूक्ष्म विद्येविषयी सांगून धर्माचा उपदेश करून आमच्या जीवनात यथोचित वृद्धी कराल. आपणांकडून प्रेरणा प्राप्त करून आम्ही श्रेष्ठ उत्तम सत्कर्म करू आणि इतरांकडूनही सत्कर्म करून घेऊ. अशा प्रकारे सर्वांनी सर्व जीवांच्या सुखात आणि विद्या-ज्ञानाची नित्य उन्नती करावी.॥31॥
Subject
मनुष्यांनी धर्मात्मा, ज्ञानी आणि विद्वान व्यक्तींचा सत्कार करणे का व कसे उचित आहे, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -