Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 30

34 Mantra
2/30
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भूरिक् पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
ये रू॒पाणि॑ प्रतिमु॒ञ्चमा॑ना॒ऽअसु॑राः॒ सन्तः॑ स्व॒धया॒ चर॑न्ति। प॒रा॒पुरो॑ नि॒पुरो॒ ये भर॑न्त्य॒ग्निष्टाँल्लो॒कात् प्रणु॑दात्य॒स्मात्॥३०॥

ये। रू॒पाणि॑। प्र॒ति॒मु॒ञ्चमा॑ना॒ इति॑ प्रतिऽमुञ्चमा॑नाः। असु॑राः। सन्तः॑। स्व॒धया॑। चर॑न्ति। प॒रा॒पुर॒ इति॑ परा॒ऽपुरः॑। नि॒ऽपुर॒ इति॑ नि॒पुरः॑। ये। भर॑न्ति। अ॒ग्निः। तान्। लो॒कात्। प्र। नु॒दा॒ति॒। अ॒स्मात् ॥३०॥

Mantra without Swara
ये रूपाणि प्रतिमुञ्चमानाऽअसुराः सन्तः स्वधया चरन्ति । परापुरो निपुरो ये भरन्त्यग्निष्टान्लोकात्प्र णुदात्यस्मात् ॥

ये। रूपाणि। प्रतिमुञ्चमाना इति प्रतिऽमुञ्चमानाः। असुराः। सन्तः। स्वधया। चरन्ति। परापुर इति पराऽपुरः। निऽपुर इति निपुरः। ये। भरन्ति। अग्निः। तान्। लोकात्। प्र। नुदाति। अस्मात्॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे दुष्ट मनुष्य (रूपाणि) मनात आपल्यासाठी सोयीस्कर अशा अनुकूल विचार ठेवून (प्रतिमुंचमाना:) दुसर्‍यांपासून आपले दुष्ट विचार लपवून ठेवतात आणि इतरांसाठी अपायकारक विचार प्रकट करतात, अशा (असुरा:) धर्माला (सन्त:) आहेत, असे बरेच लोक (स्वधमा) भूमिवर जिकडे तिकडे फिरत असतात, येतात, जातात. तसेच जे (परापुर:) जगाच्या विपरीत कर्म करून केवळ स्वत:च्या सुखासाठी अथवा केवळ स्वत: सुख प्राप्त करण्यासाठी धडपड करतात व (निपुर:) दुष्ट स्वभावाचे (सन्त) आहेत, म्हणजे जे अन्यायाने इतरांची धनसंपदा पदार्थादी बळकावतात, (तान्) त्या दुष्टांना (अग्नी:) जगदीश्‍वर (अस्मात्) या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लोकापासून (प्रणुदाति) दूर करो. (दुर्जन, स्वार्थी व अन्यायी जन जगात असू नयेत किंवा आमच्यापासून दूर असावेत) ॥30॥
Essence
भावार्थ - जे दुष्ट लोक मन, वचन आणि शरीराने असत्य व कपटपूर्ण आचरण करतात, तसेच अन्य जीवांना अन्याय व अत्याचाराद्वारे पीडा देतात आणि स्वत:च्या सुखसोयीसाठी इतरांचे पदार्थ हिसकावून घेतात, ईश्‍वर अशा दुष्टांना दु:ख देऊन दंडित करतो व नीच योनींत जन्माला घालतो की ज्यामुळे त्यांना त्यानी केलेल्या पापकर्मांचे पळ भोगून पुन्हा मानवदेह मिळविण्यास पात्र होता येईल. यामुळे सर्व माणसांकरिता हेच उचित आहे की अशा दुष्ट माणसांपासून व पापापासून दूर राहून सदैव केवळ धर्माचरण करावे. ॥30॥
Subject
पूर्वोक्त असुरांची लक्षणें कोणती, हे पुढील मंत्रात प्रकाशित केले आहे. -