Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 3

34 Mantra
2/3
Devata- अग्निः सर्वस्य Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- भूरिक् आर्ची त्रिष्टुप्,भूरिक् आर्ची पङ्क्ति,पङ्क्ति, Swara- धैवतः, पञ्चम
Mantra with Swara
ग॒न्ध॒र्वस्त्वा॑ वि॒श्वाव॑सुः॒ परि॑दधातु॒ विश्व॒स्यारि॑ष्ट्यै॒ यज॑मानस्य परि॒धिर॑स्य॒ग्निरि॒डऽई॑डि॒तः। इन्द्र॑स्य बा॒हुर॑सि॒ दक्षि॑णो॒ विश्व॒स्यारि॑ष्ट्यै॒ यज॑मानस्य परि॒धिर॑स्य॒ग्निरि॒डऽई॑डि॒तः। मि॒त्रावरु॑णौ त्वोत्तर॒तः परि॑धत्तां ध्रु॒वेण॒ धर्म॑णा॒ विश्व॒स्यारि॑ष्ट्यै॒ यज॑मानस्य परि॒धिर॑स्य॒ग्निरि॒डऽई॑डि॒तः॥३॥

ग॒न्ध॒र्वः। त्वा॒। वि॒श्वाव॑सुः॒। वि॒श्व॑वसु॒रिति॑ वि॒श्वऽव॑सुः। परि॑। द॒धा॒तु॒। विश्व॑स्य। अरि॑ष्ट्यै। यज॑मानस्य। प॒रि॒धिरिति॑ परि॒ऽधिः। अ॒सि॒। अ॒ग्निः। इ॒डः। ई॒डि॒तः। इन्द्र॑स्य। बा॒हुः। अ॒सि॒। दक्षि॑णः। विश्व॑स्य। अरि॑ष्ट्यै। यज॑मानस्य। प॒रि॒धिरिति॑ परि॒ऽधिः। अ॒सि॒। अ॒ग्निः। इ॒डः। ई॒डि॒तः। मि॒त्रावरु॑णौ। त्वा॒। उ॒त्त॒र॒तः। परि॑। ध॒त्ता॒म्। ध्रु॒वेण॑। धर्म॑णा। विश्व॑स्य। अरि॑ष्ट्यै। यज॑मानस्य। प॒रि॒धिरिति॑ परि॒ऽधिः। अ॒सि॒। अ॒ग्निः। इ॒डः। ई॒डि॒तः ॥३॥

Mantra without Swara
गन्धर्वस्त्वा विश्वावसुः परिदधातु विश्वस्यारिष्ट्यै यजमानस्य परिधिरस्यग्नडऽईडितः । इन्द्रस्य बाहुरसि दक्षिणो विश्वस्यारिष्ट्यै यजमानस्य परिधिरस्यग्निरिड ईडितः । मित्रावरुणौ त्वोत्तरतः परि धत्तान्धु्रवेण धर्मणा विश्वस्यारिष्ट्यै यजमानस्य परिधिरस्यग्निरिडऽईडितः ॥

गन्धर्वः। त्वा। विश्वावसुः। विश्ववसुरिति विश्वऽवसुः। परि। दधातु। विश्वस्य। अरिष्ट्यै। यजमानस्य। परिधिरिति परिऽधिः। असि। अग्निः। इडः। ईडितः। इन्द्रस्य। बाहुः। असि। दक्षिणः। विश्वस्य। अरिष्ट्यै। यजमानस्य। परिधिरिति परिऽधिः। असि। अग्निः। इडः। ईडितः। मित्रावरुणौ। त्वा। उत्तरतः। परि। धत्ताम्। ध्रुवेण। धर्मणा। विश्वस्य। अरिष्ट्यै। यजमानस्य। परिधिरिति परिऽधिः। असि। अग्निः। इडः। ईडितः॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गन्धर्व:) पृथ्वीला आणि वाणीला धारण करणार्‍या (विश्‍वावसु:) विश्‍वाला निवासयोग्य करणार्‍या (इड:) स्तुती करण्यास योग्य, अशा (अग्नी:) सूर्यरूप ज्या अग्नीची विदुसेत (ईडित:) स्तुती करतात, तो अग्नी म्हणजे सूर्य (विश्‍वास) या जगाच्या अथवा विशेष करून (यजमानस्य) या यज्ञ करणार्‍या विद्वानाच्या (अरिष्ट्यै) दु:ख-निवारणासाठी यज्ञाला (परिदधातु) धारण करतो. विद्वानासाठी आवश्यक आहे की त्याने देखील विद्यांच्या सिद्धी-प्राप्तीसाठी यज्ञाला (परिदधातु) धारण करावे म्हणजे यज्ञ करावा. तसेच वायू (इन्द्रस्य) सूर्याची (बाहु:) शक्ती अथवा संहायस आहे (दक्षिण:) वृष्टी करण्यास समर्थ आहे तसेच (परिधि:) जो शिल्प विद्येला जाणण्याची परिकोमा आहे, जो त्यास धारण करणारा व (इड:) देह, प्रकाश आदी गुणांमुळे प्रशंसणीय आहे (ईडित:) जो शोध करून प्राप्त झालेला (अग्नि:) असा ती प्रत्यक्ष भौतिक अग्नी आहे, असे वायू आणि अग्नी या दोन्हीचा चांगल्या प्रकारे योग्य रीतीने शिल्पविद्येत प्रयोग केल्यानंतर हे दोन्ही (यज्ञमानस्य) शिल्पविद्येचे जिज्ञासू व्यक्तीच्या अथवा (विश्‍वस्य) जगातील सर्व जीवांच्या (अरिष्ट्यै) सुखाचे कारण होतात. तसेच ब्रह्मांडात राहणारे व गमन-आगमन करण्याचा स्वभाव असलेले (मित्रवरूणौ) प्राण आणि अपान नामक वायू आहेत, ते (ध्रुवेण) निश्‍चल राहून (धर्मणा) आपल्या धारणाशक्तीमुळे (उत्तरत:) वायू आणि अग्नीच्या नंतर म्हणजे त्यांच्या कार्यानंतरच्या काळात (विश्‍वस्य) चराचर जगताचा तसेच (यजमानस्य) सर्वांशी मैत्रीभाव ठेवणार्‍या सज्जन व्यक्तीसव्या (अरिष्ट्यै) सुखाचा हेतू होतात आणि (त्वा) त्या पूर्वोक्त यज्ञाला (परिधत्राम्) सर्वप्रकारे धारण करतात. तसेच जो एक अग्नी (इड:) विद्येच्या प्राप्तीकरिता (तंत्र आणि विज्ञाना करिता) वांछनीय आहे, (परिघि:) जो सर्व शिल्प (तंत्र आणि विज्ञाना) विद्येला प्राप्त करण्याचे अभिवार्य कारण आहे, (ईडित:) विद्येची इच्छा करणार्‍यांसाठी जो अवश्यमेव प्रशंसनीय आहे, असा जो (अग्नी) विद्युतरूप अग्नी (अग्नि) आहे, तो देखील या यज्ञास सर्व प्रकारे धारण करतो. मनुष्यांनी सूर्य, वायू, अग्नी आणि विद्युतरूप अग्नी यांचा शोध करून यथावत जाणावे व त्यांपासून योग्य तो लाभ घ्यावा.॥3॥
Essence
भावार्थ - परमेश्‍वराने सूर्य, विद्युत् आणि आग या तीन प्रकारच्या अग्नीची रचना केली आहे, त्या अग्नीला शिल्पविद्येच्या साहाय्याने, यंत्रादिकात योग्य प्रकारे प्रयुक्त केल्यास तो अनेक कार्यांमध्ये पूर्णत्व प्राप्त करून देणारा होता.॥3॥
Subject
हा यज्ञ अग्नी आदी पदार्थांद्वारे धारण केला जातो, हा विचार पुढील मंत्रात सांगितला आहे -