Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 29

34 Mantra
2/29
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- स्वराट् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒ग्नये॑ कव्य॒वाह॑नाय॒ स्वाहा॒ सोमा॑य पितृ॒मते॒ स्वाहा॑। अप॑हता॒ऽअसु॑रा॒ रक्षा॑सि वेदि॒षदः॑॥२९॥

अ॒ग्नये॑। क॒व्य॒वाह॑ना॒येति॑ कव्य॒ऽवाह॑नाय। स्वाहा॑। सोमा॑य। पि॒तृ॒मत॒ इति॑ पितृ॒ऽमते॑। स्वाहा॑। अप॑हता॒ इत्यप॑ऽहताः। असु॑राः। रक्षा॑सि। वे॒दि॒षदः॑। वे॒दि॒सद॑ इति॑ वेदि॒ऽषदः॑ ॥२९॥

Mantra without Swara
अग्नये कव्यवाहनाय स्वाहा सोमाय पितृमते स्वाहा अपहताऽअसुरा रक्षाँसि वेदिषदः ॥

अग्नये। कव्यवाहनायेति कव्यऽवाहनाय। स्वाहा। सोमाय। पितृमत इति पितृऽमते। स्वाहा। अपहता इत्यपऽहताः। असुराः। रक्षासि। वेदिषदः। वेदिसद इति वेदिऽषदः॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - मनुष्यांकरिता हेच उचित हितकारी (यज्ञादी) कर्माची प्रेरणा देणार्‍या (अग्नेय) सर्व पदार्थांना आपोआप एका स्थानाहून दुसर्‍या स्थानापर्यंत नेणार्‍या अग्नीचा स्वीकार करावा. सुख प्राप्तीकरिता (स्वाहा) वेदवाणीचे उच्चारण करीत (पितृमते) पितर म्हणजे वसंत आदी ऋतू. या ऋतूंमधे उगवणार्‍या (सोमाय) ऐश्‍वर्यदायिनी सोमलतेला (स्वाहा) पदार्थांच्या धारक गुणांशी संयुक्त करून. योग्य उपयोग करावा. (वेदमंत्राद्वारे सोमलतेची यज्ञात आहुती द्यावी) यानंतर (वदिषद:) पृथ्वीवर विचरणारे व (रक्षांसि) दुसर्‍यांना पीडा देणारे जे स्वार्थी लोक आणि (असुरा:) दुष्ट स्वभाव असलेले मूर्ख लोक आहेत, त्यांना (अपहृता) विनष्ट केले पाहिजे. ॥29॥
Essence
भावार्थ - योग्य त्या रीती-युक्तीद्वारे शिल्पविद्येत प्रयुक्त केलेला हा अग्नी विद्वनांसाठी उत्तमोत्तम कार्यांची सिद्धी देणारा होतो. मनुष्यांनी नित्य व सदैव असेच प्रयत्न करीत राहिले पाहिजेत की ज्यायोगे जगाचा उपकार होऊन सर्व सुखी होतील आणि भूमीवरील दुर्जनांची व दोषांची निवृत्ती होईल ॥29॥
Subject
भौतिक अग्नी आणि चंद्र यांच्या गुणांविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -