Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 28

34 Mantra
2/28
Devata- अग्निर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भूरिक् उष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
अग्ने॑ व्रतपते व्र॒तम॑चारिषं॒ तद॑शकं॒ तन्मे॑ऽराधी॒दम॒हं यऽए॒वाऽस्मि॒ सोऽस्मि॥२८॥

अग्ने॑। व्र॒त॒प॒त॒ऽइति॑ व्रतऽपते। व्र॒तम्। अ॒चा॒रि॒ष॒म्। तत्। अ॒श॒क॒म्। तत्। मे॒। अ॒रा॒धि॒। इ॒दम्। अ॒हम्। यः। ए॒व। अस्मि॑। सः। अ॒स्मि॒ ॥२८॥

Mantra without Swara
अग्ने व्रतपते व्रतमचारिषंन्तदशकंन्तन्मेराधीदमहँयऽएवास्मि सोस्मि ॥

अग्ने। व्रतपतऽइति व्रतऽपते। व्रतम्। अचारिषम्। तत्। अशकम्। तत्त्। मे। अराधि। इदम्। अहम्। यः। एव। अस्मि। सः। अस्मि॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (व्रतपते) हे न्याययुक्त आणि नियतकर्मांचे पालन करणारे (अग्ने) सत्यरूप परमेश्‍वर आपण (व्रतम्) माझ्या साठी सत्य आणि नियमानुकूल जे सत्याचरणरूप व्रत (अराधि) निश्‍चित केले आहे, (तत्) आचरणीय सत्य नियमांचे विधिवत पालन करण्यात मी (अशकल्) समर्थ होईन, अशी कृपा करा. मी त्या सत्यनियमांप्रमाणे (अचारिषम्) उत्तम प्रकारे व आचरण करीत राहीन असे करा. तसेच मी जे काही उत्तम किंवा अधर्म केले आहे, त्याप्रमाणेच व मी ते ते भोगले. आता देखील मी ज्या ज्या (उत्तम-अपम) कर्मांचे आचरण करीत (अस्मि) आहे, त्या कर्माचे फळ भोगणारा (अस्मि) मीच होणार आहे. (हे मी जाणतो). ॥28॥
Essence
भावार्थ - माणसाने सदैव निश्‍चयाने हे समजून घ्यावे की मी आता जसे कर्म करतो किंवा केले आहे. परमेश्‍वराच्या व्यक्त्येप्रमाणे मी तसेच फळ भोगत आहे, भोगणार आहे. सर्व जीवांना त्यांनी केलेल्या कर्माच्या विपरीत असे फळ कदापी मिळत नाही. यामुळे माणसाने नेहमी धर्मयुक्त कर्मच करावेत की ज्यामुळे त्यास कधीही दु:खी व्हावे लागणार नाही. ॥28॥
Subject
सत्वाचरणामुळे कोणते सुख मिळते, ते पुढील मंत्रात सांगितले आहे -