Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 27

34 Mantra
2/27
Devata- सर्वस्याग्निः Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृत् पङ्क्ति,गायत्री, Swara- पञ्चमः , षड्जः
Mantra with Swara
अग्ने॑ गृहपते सुगृहप॒तिस्त्वया॑ऽग्ने॒ऽहं गृ॒हप॑तिना भूयासꣳ सुगृहप॒तिस्त्वं मया॑ऽग्ने गृ॒हप॑तिना भूयाः। अ॒स्थू॒रि णौ॒ गार्ह॑पत्यानि सन्तु श॒तꣳ हिमाः॒ सूर्य्य॑स्या॒वृत॒मन्वाव॑र्ते॥२७॥

अग्ने॑। गृ॒ह॒प॒त॒ इति॑ गृहऽपते। सु॒गृ॒ह॒प॒तिरिति॑ सुऽगृहप॒तिः। त्वया॑। अ॒ग्ने॒। अ॒हम्। गृ॒हप॑ति॒नेति॑ गृ॒हऽप॑तिना। भू॒या॒स॒म्। सु॒गृ॒ह॒प॒तिरिति॑ सुऽगृहप॒तिः। त्वम्। मया॑। अ॒ग्ने॒। गृ॒हप॑ति॒नेति॑ गृ॒हऽप॑तिना। भू॒याः॒। अ॒स्थू॒रि। नौ॒। गार्ह॑पत्या॒नीति॒ गार्ह॑ऽपत्यानि। स॒न्तु॒। श॒तम्। हिमाः॑। सूर्य्य॒स्य। आ॒वृत॒मित्या॒ऽवृत॑म्। अनु॑। आ। व॒र्त्ते॒ ॥२७॥

Mantra without Swara
अग्ने गृहपते सुगृहपतिस्त्वयाग्ने हङ्गृहपतिना भूयासँ सुगृहपतिस्त्वम्मयाग्ने गृहपतिना भूयाः । अस्थूरि णौ गार्हपत्यानि सन्तु शतँ हिमाः सूर्यस्यावृतमन्वावर्ते ॥

अग्ने। गृहपत इति गृहऽपते। सुगृहपतिरिति सुऽगृहपतिः। त्वया। अग्ने। अहम्। गृहपतिनेति गृहऽपतिना। भूयासम्। सुगृहपतिरिति सुऽगृहपतिः। त्वम्। मया। अग्ने। गृहपतिनेति गृहऽपतिना। भूयाः। अस्थूरि। नौ। गार्हपत्यानीति गार्हऽपत्यानि। सन्तु। शतम्। हिमाः। सूर्य्यस्य। आवृतमित्याऽवृतम्। अनु। आ। वर्त्ते॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्राचा संदर्भ दोन विषयांकडे आहे. परमेश्‍वर आणि गृहपति (गृहस्थाश्रमी) या दोन्हीविषयी या मंत्रात वर्णन केले आहे) - (गृहपते) घराचे पालन करणार्‍या (अग्ने) हे परमेश्‍वरा/हेविद्वान, (त्वंम्) आपण (सुमृहपति:) ब्रह्मांडरूप गृहाचे स्वामी/निवासार्थ निर्मिलेल्या घराचे पालक (अभि) आहात. अशा या (गृहपतिना) स्वामी व पालक, असलेल्या (त्वया) आपणांसह मी (सुगृहपति:) माझ्या घराचा उत्तम प्रकारे पालक (भूयासम्) होईन. हे परमेश्‍वरा/हे विद्वज्जन, (मया) श्रेष्ठ कर्माचे अनुष्ठान करणारा (गृह्यतिना) जो मी धर्मात्मा आणि पुरूषार्थी मनुष्य आहे, अशा माझ्या उपासनेचा स्वीकार करून आपण माझ्या घराचे पालन करणारे (भूमा:) व्हा. त्याप्रमाणे (मौ) गृहाचे पती (स्वामी) आम्ही दोघे स्त्री व पुरूष/पती-पत्नी आहोत, (गार्दृपत्यानि) गृहपती म्हणून आम्हां दोघांचे जे कर्तव्य-कर्म आहेत, ते (अस्थिरि) कर्तव्य आमच्यातर्फे आलस्यरहित होऊन पूर्ण (सन्तु) व्हावेत, अशी कृपा करा. अशा वर्तमान सुखकारक स्थितीत आम्ही दोघे (सूर्य्यस्य) परमेश्‍वराचे/विहानाच्या आश्रयाने (आवृतम्) रात्री व दिवसा, सर्वकाळी (शतंहिमा:) शंभर वर्षापर्यंत किंवा शंभरापेक्षा अधिक वर्ष श्रेष्ठ व्यवहार करीत राहू. ॥27॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. गृहपती आम्ही दोघे स्त्री-पुरूष पुरूषार्थ करीत परमेश्‍वर आणि विद्वान की जे पदार्थांच्या स्थिती/प्रयोगास योग्य अशा संसार रूप गृहाचे/घराचे रक्षक आहेत, या दोघांच्या आश्रयात राहून आम्ही भौतिक अग्नीद्वारे सर्व पदार्थांपासून सुख प्राप्त करणारे, सर्व कार्य सिद्ध करणारे होऊ. आणि शंभर वर्षाचे प्राप्त करू. अथवा जितेन्द्रिय राहून शंभर वर्षाहून अधिक काळपर्यंत सुखेन जीवनाचा उपभोग घेऊ. ॥27॥
Subject
यज्ञानुष्ठानाद्वारे गृहस्थजनांनी कोणते हेतू/प्रयोजन सिद्ध करावेत, हे पुढील मंत्रात प्रकट केले आहे -