Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 26

34 Mantra
2/26
Devata- ईश्वरो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
स्व॒यं॒भूर॑सि॒ श्रेष्ठो॑ र॒श्मिर्व॑र्चो॒दाऽअ॑सि॒ वर्चो॑ मे देहि। सूर्य॑स्या॒वृत॒मन्वाव॑र्ते॥२६॥

स्व॒यं॒भूरिति॑ स्वय॒म्ऽभूः। अ॒सि॒। श्रेष्ठः॑। र॒श्मिः। व॒र्चो॒दा इति॑ वर्चः॒ऽदाः। अ॒सि॒। वर्चः॑। मे॒। दे॒हि॒। सूर्य्य॑स्य। आ॒वृत॒मित्या॒ऽवृत॑म्। अनु॑। आ। व॒र्त्ते॒ ॥२६॥

Mantra without Swara
स्वयम्भूरसि श्रेष्ठो रश्मिर्वर्चादाऽअसि वर्चा मे देहि । सूर्यस्यावृतमन्वावर्ते ॥

स्वयंभूरिति स्वयम्ऽभूः। असि। श्रेष्ठः। रश्मिः। वर्चोदा इति वर्चःऽदाः। असि। वर्चः। मे। देहि। सूर्य्यस्य। आवृतमित्याऽवृतम्। अनु। आ। वर्त्ते॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे जगदीश्‍वरा, तू विद्यावान ज्ञानवान आहेस. (श्रेष्ठ) प्रशंसनीय (रश्मि:) प्रकाशमान व (स्वयंभू:) स्वयंभू (असि) आहेस. (वर्च्चोदा) विद्या देणारा (असि) आहेस (मे) मला (वर्च्व:) विज्ञान आणि प्रकाश (देही) दे. (सूर्य्यस्य) चराचर जगताचा तू आत्मा आहेस. (आवृतम्) सज्जन तुझ्या उपदेश व आदेशाच्या अधीन राहून व्यवहार करतात. तुझ्या त्या उपदेशाचा (अत्वावर्ते) मी स्वीकार करतो. (तुझ्या आदेशा-उपदेशाप्रमाणे मी वागेन) ॥26॥
Essence
भावार्थ- परमेश्‍वराचा आणि जीवाचा कोणी माता वा पिता नाहीं. (ईश्‍वर व जीव नित्य आणि अनादि आहेत) परमात्माच सूर्याचा पिता आहे. त्याच्यापेक्षा अधिक विज्ञान आणि प्रकाश (बुद्धी व प्रेरणा) देणारा कोणी नाही. मनुष्यांनी अशा या नित्य ज्ञान विज्ञानप्रदाता परमेश्‍वराच्या आज्ञेत रहावे. त्याचप्रमाणे मनुष्यांनी विद्वानांच्या उपदेशाचेही सेवन/पालन केले पाहिजे, कारण की ज्ञात, प्रकाशित व उत्पन्न पदार्थामधे जे गुण आहेत विद्वज्जन त्यां गुणांना जाणून व्यवहार आणि शिल्पादी विद्या सर्वांना शिकवितात. अशा विद्वानांच्या उपदेशाचे ग्रहण का बरे करूं नये ? ॥26॥
Subject
पुढील मंत्रात सूर्य या शब्दाने ईश्‍वर आणि विद्वान मनुष्य या दोन अर्थांचा बोध करविला आहे -