Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 24

34 Mantra
2/24
Devata- त्वष्टा देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
सं वर्च॑सा॒ पय॑सा॒ सं त॒नूभि॒रग॑न्महि॒ मन॑सा॒ सꣳ शि॒वेन॑। त्वष्टा॑ सु॒दत्रो॒ विद॑धातु॒ रायोऽनु॑मार्ष्टु त॒न्वो यद्विलि॑ष्टम्॥२४॥

सम्। वर्च॑सा। पय॑सा। सम्। त॒नूभिः॑। अग॑न्महि। मन॑सा। सम्। शि॒वेन॑। त्वष्टा॑। सु॒दत्र॒ इति॑ सु॒ऽदत्रः॑। वि। द॒धा॒तु॒। रायः॑। अनु॑। मा॒र्ष्टु॒। त॒न्वः᳕। यत्। विलि॑ष्ट॒मिति॒ विऽलि॑ष्टम् ॥२४॥

Mantra without Swara
सँवर्चसा पयसा सन्तनूभिरगन्महि मनसा सँ शिवेन । त्वष्टा सुदत्रो विदधातु रायोनुमार्ष्टु तन्वो यद्विलिष्टम् ॥

सम्। वर्चसा। पयसा। सम्। तनूभिः। अगन्महि। मनसा। सम्। शिवेन। त्वष्टा। सुदत्र इति सुऽदत्रः। वि। दधातु। रायः। अनु। मार्ष्टु। तन्वः। यत्। विलिष्टमिति विऽलिष्टम्॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - आम्ही सर्व जणांनी पुरुषार्थी व्हावे आणि (वर्चसा) ज्यात सर्व पदार्थांविषयी प्रकाश केला आहे, त्या वेदांचे पठन-अध्ययन करून व (पयसा) ज्याद्वारे पदार्थांना जाणले जाते, त्या ज्ञानास प्राप्त करून (मनसा) ज्याद्वारे सर्व व्यवहाराविषयी विचार केला जातो. त्या अन्त:करणासह (शिवेन) सर्व सुखांसह (तनूभि:) ज्याद्वारे विपुल सुज्ञाची प्राप्ती शक्य होते, त्या शरीरासह (राय:) श्रेष्ठ विद्या आणि चक्रवर्ती राज्य आदी संपत्तीना (समगन्महि) चांगल्या प्रकारे प्राप्त करू, असे व्हावे. तो (सुदत्र:) उत्तम सुख देणारा (त्वष्टा) दु:खांचा नाश करणारा आणि प्रलयकाली सर्व पदार्थांना सूक्ष्म करणारा ईश्‍वर कृपा करून आम्हांस (राय:) उक्त विद्यादी पदार्थ (संविदधातू) प्रदान करो. तसेच आमच्या (तन्व:) शरीरात (यथ्) जी (विलिष्टम्) कर्म व व्यवहार करण्याची जी परिपूर्ण क्षमता आहे, त्याला (समनुमार्ष्टु) चांगल्या प्रकारे शुद्ध करो (आमच्या कार्यक्षमतेस शक्ती देवो) ॥24॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी सर्व कामना परिपूर्ण करणार्‍या परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन करावे. उत्तम पुरूषार्थ करीत विद्याध्ययन करावे, शारीरिक बळ मिळवावे, मन शुद्ध ठेवावे स्व:चे कल्याण साधावे आणि उत्तमोत्तम लक्ष्मी (धनसंपत्ती) ची प्राप्ती सदैव करावी. यज्ञाचे अनुष्ठान व परिपूर्णता करून स्वत: सुखी व्हावे आणि इतरांनाही सुखी करावे. तसेच सर्व कार्यात आणि पदार्थात शुद्धता ठेवावी (दुराचार करू नये, अस्वच्छता ठेवूं नये) ॥24॥
Subject
यज्ञाद्वारे आम्ही कोणकोणते पदार्थ प्राप्त करू शकतो, हा विषय पुढील मंत्रात विशद केला आहे -