Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 23

34 Mantra
2/23
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृत् बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
कस्त्वा॒ विमु॑ञ्चति॒ स त्वा॒ विमु॑ञ्चति॒ कस्मै॑ त्वा॒ विमु॑ञ्चति॒ तस्मै॑ त्वा॒ विमु॑ञ्चति॒। पोषा॑य॒ रक्ष॑सां भा॒गोऽसि॥२३॥

कः। त्वा॒। वि। मु॒ञ्च॒ति॒। सः। त्वा॒। वि। मु॒ञ्च॒ति॒। कस्मै॑। त्वा॒। वि। मु॒ञ्च॒ति॒। तस्मै॑। त्वा॒। वि। मु॒ञ्च॒ति॒। पोषा॑य। रक्ष॑साम्। भा॒गः। अ॒सि॒ ॥२३॥

Mantra without Swara
कस्त्वा विमुञ्चति स त्वा विमुञ्चति कस्मै त्वावि मुञ्चति तस्मै त्वा विमुञ्चति । पोषाय रक्षसाम्भागो सि ॥

कः। त्वा। वि। मुञ्चति। सः। त्वा। वि। मुञ्चति। कस्मै। त्वा। वि। मुञ्चति। तस्मै। त्वा। वि। मुञ्चति। पोषाय। रक्षसाम्। भागः। असि॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (कः) सुख इच्छिणारा यज्ञाचा अनुष्ठाता कोणी तरी पुरूष (त्वा) यज्ञाचा (विमुंचति) त्याग करतो का? नाही. म्हणजे असा कोणी नाही. आणि जो कोणी या यज्ञाचा त्याग करतो (त्वा) त्याला (स:) यज्ञाचा पालक परमेश्‍वर देखील त्याला (विमुंचति) सोडून देतो (यज्ञ न करणारा मनुष्य ईश्‍वरीय कृपेचा पात्र होत नाही) जो याज्ञिक हव्य पदार्थांची यज्ञात आहुती देतो (त्वा) तो त्या आहुतीला (कस्मै) कोणत्या प्रयोजनासाठी अग्नीत (विमुंचति) सोडतो (तस्मै) ज्यायोगे सर्वांना सुख मिळू शकेल आणि (पोषाय) पोषक व आदी गुणांची प्राप्ती होईल, अशा प्रयोजनासाठी तो याज्ञिक जन (त्वा) त्या पदार्थ समूहाला (विमुंचति) अग्नीत सोडतो. या विपरीत असे की जे पदार्थ सर्वांच्या उपकारासाठी यज्ञात प्रयुक्त होत नाहीत, ते पदार्थ (रक्षसाम्) दुष्ट प्राण्यांचा (भाग:) भाग होतात म्हणजे उपयोगात येतात. (यज्ञात आहुती पदार्थ सर्वोपकारक ठरतात आणि इतर पदार्थांचा दुरूपयोग होतो ते व्यर्थ होतात) ॥23॥
Essence
भावार्थ - ईश्‍वराने जे जे कर्म, व्यवहारादी करण्यासाठी आणि इतरांना करविण्यासाठी आदेश दिला आहे, जो माणूस त्यांचा त्याग करतो, तो सर्व सुखांपासून वंचित होतो आणि दुर्जनांपासून नीडित होऊन नेहमी सर्वदृष्ट्या दु:खी राहतो. कोणीतरी कोणाला विचारले की जो मनुष्य यज्ञाचा त्याग करतो, त्याचे काय होते? दुसरा माणूस उत्तर देतो त्या मनुष्याचा ईश्‍वर देखील त्याग करतो (त्यावर कृपा करीत नाही) पुन्हा पहिला माणूस विचारतो - ‘ईश्‍वर अशा व्यक्तीचा कशासाठी त्याग करतो?’ दुसरा उत्तर देतो - ‘दु:ख भोगण्यासाठी ।’ जो कोणी ईश्‍वराज्ञेचे पालन करतो, तो सर्व सुखांचा अधिकारी होण्यास पात्र आहे आणि जो ईश्‍वराज्ञेचा त्याग किंवा उल्लंघन करतो, तो राक्षस (दु:खी व दुष्ट मनुष्य) होतो. ॥23॥
Subject
यज्ञीय पदार्थ अग्नीत कोणत्या हेतूने सोडला जातो, पुढील मंत्रात याविषयी सांगितले जाते -