Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 22

34 Mantra
2/22
Devata- इन्द्रो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
सं ब॒र्हिर॑ङ्क्ता ह॒विषा॑ घृ॒तेन॒ समा॑दि॒त्यैर्वसु॑भिः॒ सम्म॒रुद्भिः। समिन्द्रो॑ वि॒श्वदे॑वेभिरङ्क्तां दि॒व्यं नभो॑ गच्छतु॒ यत् स्वाहा॑॥२२॥

सम्। ब॒र्हिः। अ॒ङ्क्ता॒म्। ह॒विषा॑। घृ॒तेन॑। सम्। आ॒दि॒त्यैः। वसु॑भि॒रिति॒ वसु॑ऽभिः। सम्। म॒रुद्भि॒रिति॑ म॒रुत्ऽभिः॑। सम्। इन्द्रः॑। वि॒श्वदे॑वेभि॒रिति॑ वि॒श्वऽदे॑वेभिः। अ॒ङ्क्ता॒म्। दि॒व्यम्। नभः॑। ग॒च्छ॒तु॒। यत्। स्वाहा॑ ॥२२॥

Mantra without Swara
सम्बर्हिरङ्क्ताँ हविषा घृतेन समादित्यैर्वसुभिः सम्मरुद्भिः । समिन्द्रो विश्वदेवेभिरङ्क्तान्दिव्यन्नभो गच्छतु यत्स्वाहा ॥

सम्। बर्हिः। अङ्क्ताम्। हविषा। घृतेन। सम्। आदित्यैः। वसुभिरिति वसुऽभिः। सम्। मरुद्भिरिति मरुत्ऽभिः। सम्। इन्द्रः। विश्वदेवेभिरिति विश्वऽदेवेभिः। अङ्क्ताम्। दिव्यम्। नभः। गच्छतु। यत्। स्वाहा॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यत्) जेव्हां तुम्ही हवन करण्यास योग्य अशा द्रव्यांना (हविषा) होम करण्यास योग्य अशा (घृतेन) घृत आदी सुगंधित पदार्थांशी मिश्रित करून यज्ञ कराल, तेव्हां तो यज्ञ (आदित्यै: बारा महिने (वसुभि:) अग्नी आदी आठ निवासाचे स्थान आणि (मरूद्भि:) प्रजाजन यांच्याशी संयुक्त होऊन (संमक्ताम्) चांगल्या प्रकारे सुखाची उत्पत्ती व विकास करील. (इन्द्र:) सूर्यलोक यज्ञात आहुत्या (सवाहा) सुगंधित पदार्थांची युक्त अशा हवीला (संगच्छतु) वर अंतरिक्षात पाठवितो. पुन्हा सुर्य त्या (सम्) चांगल्या प्रकारे (विश्‍वेदेवेभि:) आपल्या किरणांनी मिश्रित करून (दिव्यम्) त्याच्या प्रकाशात एकत्रित झालेल्या (नभ:) जनाला (सुमंक्ताम्) चांगल्या हेतूसाठी सर्वांच्या सुखासाठी देतो. ॥22॥
Essence
भावार्थ- यज्ञासाठी चांगल्या पद्धतीने शुद्ध व तयार केलेले जे हवी अग्नीत टाकले जाते, ते अंतरिक्षामध्ये वायू, जल आणि सूर्याच्या किरणांशी मिळून इकडे तिकडे प्रसार पावते आणि आकाशस्य सर्व पदार्थांना दिव्य गुणांनी युक्त करून प्रजेला उत्तम प्रकारे सुखी करते. यामुळे मनुष्यांनी उत्तम हव्या-सामग्री आणि उत्तमोक्त साधनांद्वारे पूर्वोक्त तीन प्रकारच्या यज्ञाचे नित्य अनुष्ठान केले पाहिजे. ॥22॥
Subject
यज्ञाद्वारे उर्ध्वदिशेस पाठविलेले पदार्थ अंतरिक्षात कोणासह राहतात, त्याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे. -