Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 21

34 Mantra
2/21
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भूरिक् ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
वे॒दोऽसि॒ येन॒ त्वं दे॑व वेद दे॒वेभ्यो॑ वे॒दोऽभ॑व॒स्तेन॒ मह्यं॑ वे॒दो भूयाः॑। देवा॑ गातुविदो गा॒तुं वि॒त्त्वा गा॒तुमि॑त। मन॑सस्पतऽइ॒मं दे॑व य॒ज्ञꣳ स्वाहा॒ वाते॑ धाः॥२१॥

वे॒दः। अ॒सि॒। येन॑। त्वम्। दे॒व॒। वे॒द॒। दे॒वेभ्यः॑। वे॒दः। अभ॑वः। तेन॑। मह्य॑म्। वे॒दः॒। भू॒याः॒। देवाः॑। गा॒तु॒वि॒द॒ इति॑ गातुऽविदः। गा॒तुम्। वि॒त्त्वा। गा॒तुम्। इ॒त॒। मन॑सः। प॒ते॒। इ॒मम्। दे॒व॒। य॒ज्ञम्। स्वाहा॑। वाते॑। धाः॒ ॥२१॥

Mantra without Swara
वेदोसि येन त्वन्देव वेद देवेभ्यो वेदो भवस्तेन मह्यँवेदो भूयाः । देवा गातुविदो गातुँवित्त्वा गातुमित । मनसस्पतऽइमन्देव यज्ञँस्वाहा वाते धाः ॥

वेदः। असि। येन। त्वम्। देव। वेद। देवेभ्यः। वेदः। अभवः। तेन। मह्यम्। वेदः। भूयाः। देवाः। गातुविद इति गातुऽविदः। गातुम्। वित्त्वा। गातुम्। इत। मनसः। पते। इमम्। देव। यज्ञम्। स्वाहा। वाते। धाः॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (देव) हे शुभ देणार्‍या जगदीश्‍वरा (त्वम्) तू (वेद:) चराचर जगताला जाणणारा (असि) आहेस. सर्व जगाला (वेद) जाणतोस. तू दिलेल्या (येन) ज्या विज्ञानाच्या आणि वेदांच्या ज्ञानाने (वेदेभ्य:) विद्वान जन (वेद:) पदार्थांचे गुणादींचे ज्ञान प्राप्त करणारे (असंभ:) होतात, (तेन) त्या विज्ञानाच्या प्रकाशाने तू (मह्यम्) विशेष ज्ञानाची इच्छा बाळगणार्‍या (वेद:) विज्ञान देणारा (भूया:) हो. (मातृनिद:) स्तुती-प्रार्थनादीचे ज्ञानी (देवा:) हे विद्वज्नहो, ज्या वेदांनी लोक सर्व विद्यादी ज्ञान मिळवतात, त्यांनी तुम्ही (मातृम्) विशेष ज्ञान (वित्वा) प्राप्त करून (गातुम्) प्रशंसनीय वेदांना (इत) प्राप्त करा (त्यांचे पठन-पाठन, अध्ययवादी करा) (देव) हे सर्व विश्‍वाचे प्रकाशक व पालक परमेश्‍वरा, तू (इमम्) या अनुष्ठान करण्यास योग्य अशा (यज्ञम्) क्रियाकांडाद्वारे सिद्ध होणार्‍या यज्ञरूप संसाराला (स्वाहा) केलेल्या क्रियेप्रमाणे अनुकूल हो आणि यज्ञाहुतीला (वाते) वायू मधे (धा:) स्थित कर. विद्वजजनो तुम्ही विज्ञानाच्या सहाय्याने विशेष ज्ञान देणार्‍या परमेश्‍वराची नित्य उपासना करा.॥21॥
Essence
भावार्थ - हे विद्वान लोकहो, ज्या वेद प्रदाता परमेश्‍वराने तुमच्यासाठी वेदविद्येचा प्रकाश केला आहे, तुम्ही त्याची उपासना नित्य करा. तसेच वेदविद्येचे ज्ञान संपादित करून क्रियाकांडाप्रमाणे यज्ञादी कार्याद्वारे सर्वांचे कल्याण करा, हेच तुमच्यासाठी उचित कर्म आहे. कारण की वेदात सांगितलेल्या ज्ञानाविना तसेच त्यात सांगितलेल्या करणीय कर्मांविना मनुष्यांना कधीही सुख मिळणार नाही. म्हणून वेदविद्येने. सर्वसाक्षी परमेश्‍वराला जाणून घ्या व त्यास सर्वव्यापक मानून नित्य धर्मानुकूल राहा.॥21॥
Subject
तो जगदीश्‍वर कसा आहे, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -