Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 20

34 Mantra
2/20
Devata- अग्निसरस्वत्यौ देवते Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- भूरिक् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
अग्ने॑ऽदब्धायोऽशीतम पा॒हि मा॑ दि॒द्योः पा॒हि प्रसि॑त्यै पा॒हि दुरि॑ष्ट्यै पा॒हि दुर॑द्म॒न्याऽअ॑वि॒षं नः॑ पि॒तुं कृ॑णु। सु॒षदा॒ योनौ॒ स्वाहा॒ वाड॒ग्नये॑ संवे॒शप॑तये॒ स्वाहा॒ सर॑स्वत्यै यशोभ॒गिन्यै॒ स्वाहा॑॥२०॥

अग्ने॑। अ॒द॒ब्धा॒यो॒ऽ इत्य॑दब्धऽआ॒यो। अ॒शी॒त॒म॒। अ॒शि॒त॒मेत्य॑शिऽतम। पा॒हि। मा॒। दि॒द्योः। पा॒हि। प्रसि॑त्या॒ इति॒ प्रऽसि॑त्यै। पा॒हि। दुरि॑ष्ट्या॒ इति॒ दुःऽइ॑ष्ट्यै। पा॒हि। दु॒र॒द्म॒न्या इति॑ दुःऽअद्म॒न्यै॑। अ॒वि॒षम्। नः॒। पि॒तुम्। कृ॒णु॒। सु॒षदा॑। सु॒सदेति॑ सु॒ऽसदा॑। योनौ॑। स्वाहा॑। वाट्। अ॒ग्नये॑। सं॒वे॒शप॑तय॒ इति॑ संवे॒शऽप॑तये। स्वाहा॑। सर॑स्वत्यै। य॒शो॒भ॒गिन्या॒ इति॑ यशःऽभ॒गिन्यै॑। स्वाहा॑ ॥२०॥

Mantra without Swara
अग्ने दब्धायो शीतम पाहि मा दिद्योः पाहि प्रसित्यै पाहि दुरिष्ट्यै पाहि दुरद्मन्याऽअविषन्नः पितुङ्कृणु सुषदा योनौ स्वाहा वाडग्नये सँवेशपतये स्वाहा सरस्वत्यै यशोभगिन्यै स्वाहा ॥

अग्ने। अदब्धायोऽ इत्यदब्धऽआयो। अशीतम। अशितमेत्यशिऽतम। पाहि। मा। दिद्योः। पाहि। प्रसित्या इति प्रऽसित्यै। पाहि। दुरिष्ट्या इति दुःऽइष्ट्यै। पाहि। दुरद्मन्या इति दुःऽअद्मन्यै। अविषम्। नः। पितुम्। कृणु। सुषदा। सुसदेति सुऽसदा। योनौ। स्वाहा। वाट्। अग्नये। संवेशपतय इति संवेशऽपतये। स्वाहा। सरस्वत्यै। यशोभगिन्या इति यशःऽभगिन्यै। स्वाहा॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्राचे दोन अर्थ आहेत - एक ईश्‍वरपरक आणि दुसरा - अग्निपरक) (अदव्धामो) निर्विघ्न आयुष्य देणार्‍या (अग्ने) हे परमेश्‍वरा, (अशीतमम्) चरावर संसारात व्यापक अशा या यज्ञाचे तू (दुरिष्टै) दुष्ट म्हणजे वेदविरूद्ध यज्ञापासून (पाहि) रक्षण कर (आम्ही शुद्ध व वेद विहित रीतीनेच यज्ञ करावा. किंवा कोणीही वेदविरूद्ध पद्धतीने यज्ञ करू नये, असे कर) (मा) मला (दिद्यो:) अत्यधिक दाहक अशा दु:खापासून (दाहि) वाचव. तसेच (प्रसित्यै) भीषण व दृढ बन्धनांपासून (पाहि) दूर ठेव. (दुरप्नन्यै) दूषित अन्न की जे घोर विपत्तीप्रमाणे आहे, त्यापासून (पाहि) आम्हांला वाचव. (आम्हांस उत्तम व निर्दोष अन्न मिळो) (न:) आमच्याकरिता (अविषम्) विषरहित (पितुम्) अभादी भोज्य पदार्थ (कृणु) उत्पन्न कर, तसेच (न:) आम्हांला (मुषदा) सुखदायक न दृढ घरात स्थिरता दे. त्या घरात आम्ही स्थिर राहून (स्वाहा) (वाट्) वेदोक्त वाक्यांनी संपन्न होणार्‍या उत्तम क्रिया (कृणु) करू, असे कर. अशा उत्तम क्रिया, कार्य करीत (यशोभगिन्यै) सत्यवचनांनी युक्त व उत्तम कर्मांची प्रेरणा देणारी (सरस्वत्यै) पदार्थांच्या गुणांना प्रकाशित करणारी ज्ञानयुक्त वेदवाणी ज्या परमेश्‍वराने आम्हांस दिली आहे, त्यास आम्ही (स्वाहा) धन्यवाद देतो. (संवेशपतये) सुखपूर्वक निवास वा प्रवेश करण्यास योग्य अशा पृथ्वी आदी लोकांचा तू पती म्हणजे पालन करणारा आहेस. अशा (अग्नेये) हे परमेशा त्या पदार्थांच्या प्राप्तीबद्दल आम्ही तुला (स्वाहा) धन्यवाद देतो आणि (नम:) तुला नमस्कार करतो. ॥1॥ हे भगवान जगदीश्‍वरा, तू (अदक्धायो) निर्विघ्न जीवन देणार्‍या (अग्नी) भौतिक अग्नीची रचना केली आहेस. तो अग्नी (अशीवमम्) सर्वत्र व्यापक यज्ञाचे (दुरिष्ट्यै) दोषयुक्त यज्ञापासून (पाहि) रक्षण करतो. (मा) मला (दिद्यो:) आत्यतिक दु:खापासून (पाहि) वाचवितो. (प्रसिव्यै) दारिद्रय सारख्या भीषण बंधनापासून (पाहि) वाचवितो. तसेच (दुरअन्ये) दूषित अन्नाचे सेवन करण्या पासून वाचवितो. (न:) आमच्या (पितुम्) अन्नादी पदार्थांना (अविषम्) विष आदी दोषांपासून दूर ठेवतो (अग्नी यज्ञाचा मुख्य अंग आहे. दु:ख आणि दारिद्रयनाशक आहे. अन्नास निर्दोष करतो व आम्हांस हानीकारक अन्नापासून वाचवितो) तो अग्नी (सुषदा) सुखदायी दृढ स्थिर गृह देतो अथवा पुढील जन्मांमधे (खाद्य) (वाट्) वेदोक्त वाक्यांनी सिद्ध होणार्‍या क्रियांचा हेतू आहे. आम्ही अशा (सेवेशपवये) पृथिवी आदी लोकांचे पालन करणार्‍या (अग्नेये) भौतिक अग्नीचा स्वीकार करून (स्वाहा) होम करतो व त्यासह (यशोभगिन्यै) (सरस्वत्यै) गुणवती वेदवाणीचे दान देणार्‍या (स्वाहा) परमात्म्याला धन्यवाद देतो. ॥20॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. जो सर्वव्यापी परमेश्‍वर मनुष्यांचे सर्वप्रकारे रक्षण करतो, उत्तम जन्म देतो, उत्तम कर्म करण्यास प्रेरित करतो आणि उत्तम विद्या व भोग्य पदार्थ देतो, त्याचीच पूजा-उपासना सर्वांनी करणे उचित आहे. परमेश्‍वराने आपल्या या सृष्टीमधे भौतिक अग्नीला सुर्य आणि विद्युत् रूपाने प्रकट केले आहे. त्या अग्नीचा उत्तम विद्या रीती-युक्तीने उपयोग केल्यास अग्नी सर्वप्रकारे रक्षक होतो आणि भोग्य पदार्थ देतो. परमेश्‍वराची सत्यलक्षणयुक्त प्रसिद्ध वेदवाणी देखील उत्तम जन्म देणारी आणि विद्यादीद्वारे पदार्थाने ज्ञान देणारी आहे. त्याच वेदवाणीचा सर्व विद्वानांनी स्वीकार करावा आणि इतरांनाही स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे, हेच योग्य आहे. या मंत्रात (नम:) आणि (यज्ञ) हे दोन शब्द या पूर्वीच्या मंत्रापासून घेतले आहेत. ॥20॥
Subject
तो अग्नी कसा आहे आणि कशामुळे प्रार्थनीय आहे, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -