Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 19

34 Mantra
2/19
Devata- अग्निवायू देवते Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- भूरिक् पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
घृ॒ताची॑ स्थो॒ धुर्यौ॑ पातꣳ सु॒म्ने स्थः॑ सु॒म्ने मा॑ धत्तम्। य॒ज्ञ नम॑श्च त॒ऽउप॑ च य॒ज्ञस्य॑ शि॒वे सन्ति॑ष्ठस्व॒ स्विष्टे॒ मे॒ संति॑ष्ठस्व॥१९॥

घृ॒ताची॑। स्थः॒। धुर्य्यौ॑। पा॒त॒म्। सु॒म्ने। स्थः॒। सु॒म्ने। मा॒। ध॒त्त॒म्। यज्ञ॑। नमः॑। च॒। ते॒। उप॑। च॒। य॒ज्ञस्य॑। शिवे॑। सम्। ति॒ष्ठ॒स्व॒। स्विष्टे॒ इति॑ सुऽइ॑ष्टे। मे॒। सम्। ति॒ष्ठ॒स्व॒ ॥१९॥

Mantra without Swara
घृताची स्थो धुर्या पातँ सुम्ने स्थः सुम्ने मा धत्तम् । यज्ञ नमश्च तऽउप च यज्ञस्य शिवे सन्तिष्ठस्व स्विष्टे मे सन्तिष्ठस्व ॥

घृताची। स्थः। धुर्य्यौ। पातम्। सुम्ने। स्थः। सुम्ने। मा। धत्तम्। यज्ञ। नमः। च। ते। उप। च। यज्ञस्य। शिवे। सम्। तिष्ठस्व। स्विष्टे इति सुऽइष्टे। मे। सम्। तिष्ठस्व॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - अग्नी आणि वायू (धुर्य्यौ) यज्ञाच्या मुख्य अंगाची (उद्दिष्टाची) प्राप्ती करून देणारे आहेत. (च) आणि (सुम्ने) दुखकारक आहेत. (घृताची) जलाची प्राप्ती होण्यासाठी आवश्यक त्या क्रिया व कार्य करणारे (स्थ:) आहेत. सर्व संसाराचे (पावम्) पालन करणारे आहेत. अशा या अग्नीचा आणि वायूचा मी चांगल्या प्रकारे व उत्तम क्रिया-कौशल्याद्वारे प्रयोग करतो, तेव्हा (मा) ते मला आणि यज्ञ करणार्‍यांना (सुम्ने) सुखात (धत्रम्) स्थापित करतात (मला आम्हाला सुख देतात. ज्याप्रमाणे (यज्ञ) ते जगदीश्‍वर (च) आणि (नम:) व्यापक श्रद्धा भाव ठेवणे (ते) हे याज्ञिक, तुझ्यासाठी (शिवे) कल्याणकारी होऊन (उपसंतिष्ठस्व) तुझ्याजवळ येतात, तुला अनुकूल होतात त्याप्रमाणे ते (ईश्‍वर आणि त्याची उपासना) माझ्यासाठी ही कल्याणकारी होतात. ज्याप्रमाणे मी यज्ञाचे अनुष्ठान करून (सुम्ने) सुखाचा स्वामी होतो, तद्वत तुम्ही देखील त्या यज्ञाविषयी (संतिष्ठसतव) दृढभाव ठेवा आणि यज्ञ करून सुखी व्हा.
Essence
भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमालंकार आहे. ईश्‍वर उपदेश करीत आहे की हे मनुष्यांनो, हे अग्नी आणि वायू रसाचे परमाणू करतात, जगाचे पालन करून सर्वांस सुख देतात, क्रियाकांडाचे साधन व कारण आहेत. यांचा स्वभाव वरच्या दिशेला जाण्याचा तसेच वक्र आणि सरळ दिशेला जाण्याचा आहे. तुम्ही याच्या गुणांद्वारे आपले कार्य सिद्ध वा पूर्ण करा. याप्रमाणे करून तुम्ही लोक स्थिर सुख भोगा माझ्या आज्ञेचे पालन करा आणि मलाच वारंवार नमस्कार करा.॥19॥
Subject
यज्ञाने कोणकोणते कार्य सिद्ध होतात, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -