Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 17

34 Mantra
2/17
Devata- अग्निर्देवता Rishi- देवल ऋषिः Chhand- निचृत् जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
य प॑रि॒धिं प॒र्य्यध॑त्था॒ऽअग्ने॑ देवप॒णिभि॑र्गु॒ह्यमा॑नः। तं त॑ऽए॒तमनु॒ जोषं॑ भराम्ये॒ष मेत्त्वद॑पचे॒तया॑ताऽअ॒ग्नेः प्रि॒यं पाथो॑ऽपी॑तम्॥१७॥

यम्। प॑रि॒धिम्। परि॒। अध॑त्थाः। अग्ने॑। दे॒व॒। प॒णिभि॒रिति॑ प॒णिऽभिः॑। गु॒ह्यमा॑नः। तम्। ते॒। ए॒तम्। अनु॑। जोष॑म्। भ॒रा॒मि॒। ए॒षः। मा। इत्। त्वत्। अ॒प॒। चे॒तया॑तै। अ॒ग्नेः। प्रि॒यम्। पाथः॑। अपी॑तम् ॥१७॥

Mantra without Swara
यं परिधिम्पर्यधत्थाऽअग्ने देव पाणिभिर्गुह्यमानः । तन्तऽएतमनु जोषम्भराम्येषनेत्त्वदपचेतयाताऽअग्नेः प्रियम्पाथो पीतम् ॥

यम्। परिधिम्। परि। अधत्थाः। अग्ने। देव। पणिभिरिति पणिऽभिः। गुह्यमानः। तम्। ते। एतम्। अनु। जोषम्। भरामि। एषः। मा। इत्। त्वत्। अप। चेतयातै। अग्नेः। प्रियम्। पाथः। अपीतम्॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्राचे दोन अर्थ आहेत - एक ईश्‍वरपरक आणि दुसरा भौतिक अग्नीपरक) - हे (अग्ने) सर्वव्यापी ईश्‍वरा, तू (देवपणिभि:) दिव्य गुणांनी युकत अशा विद्वानांनी केलेल्या स्तुतीप्रमाणे (गुह्यमान:) तू गुणवान आहेस मीही तुझी त्याप्रमाणे स्तुती करतो (यम्) तुझ्या त्या वर्णित गुणांचे मी अनुसरण करावे व (जोषम्) प्रीतीपूर्वक तुझ्या गुणांचे सेवन/ध्यान करावे. (परिघिम्) तुझ्या त्या श्रेष्ठतेला/प्रभुतेला (पर्य्याधत्था:) तू निरंतर धारण करतोस (तुझ्या गुणांमधे कधीही हानी, त्रुटी वा प्राप्ती होत नाही) (तम्) अशा त्या सर्वगुण संपन्न तुझ्या स्वरूपाला (इत्) केवळ त्याच स्वरूपाला (एष:) मी (अनुभरामि) आपल्या हृदयात धारण करतो. हे परमेश्‍वरा, (त्वत्) तु तुझ्यापासून मी (मा) (अपचेतया है) कधीही च्युत किंवा दूर होऊ नये. (अग्ने) हे जगदीश्‍वर, तुझ्या या सृष्टीत जे (प्रिमम्) प्रीतीकारक व (पाथ:) शरीराचे रक्षण करणारे असे अन्न मला (अपीतम्) प्राप्त झाले आहे, त्या अन्नास देखील मी कधी (मा) (अपचेतयातै) प्रतिकूल होऊं नये (अन्नाचे अवमान करू नये) ॥1॥ दुसरा अर्थ - हे जगदीश्‍वरा, (ते) तुझ्या सृष्टीमधे (एष:) हा (अग्ने) भौतिक अग्नी (देवपणिभि:) दिव्यगुणांनी युक्त पृथ्वी आदी पदार्थाद्वारे (गुह्यमान:) योग्य प्रकारे उपयोगात आणले असतांना (यम्) जे (परिधिम्) विद्यादीगुण देणारा होतो आणि (जोषम्) प्रिय अशा कर्म करविणारा होतो, त्या गुणांना तो अग्नी (पर्य्यधत्था:) सर्व प्रकारे धारण करतो, (तमित्) त्या अग्नीचा मी (अनुभरामि) स्वीकार करतो. त्या अग्नीपासून (मा) (अपचेतयातै) मी कधीही दूर अथवा प्रतिकूल होऊ नये (यज्ञ करण्यात व अग्नीपासून विविध लाभ घेण्यात आळस करू नये). तसेच या अग्नीपासून मी जे (प्रियम्) प्रिय आणि (पाथ:) स्वास्थ्यकर अन्न (अपीतम्) सेवन करतो, त्या अग्नीस मी (जोषम्) अत्यंत प्रेमाने नित्य (अनुभरामि) क्रमाने म्हणजे प्रतिदिन वाढवावे. (वाढत्या प्रमाणे त्यापासून लाभ घ्यावेत.) ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्लेषालंकार आहे. पहिल्या अम्नयाप्रमाणे अग्नी शब्दापासून परमेश्‍वराचे ग्रहण होत आहे आणि दुसर्‍या अम्नयाप्रमाणे भौतिक अग्नी हा अर्थ अपेक्षित आहे. जो ईश्‍वर प्रत्येक पदार्थात व्यापक आहे, तोच सर्व पदार्थांना धारण करतो आणि तोच विद्वज्जनांद्वारे स्तवनीय आहे. सर्व मनुष्यांनी अत्यंत प्रेमाने नित्य त्याचीच स्तुती उपासना केली पाहिजे. जे लोक त्याच्या आज्ञेचे पालन करतात, तेच नेहमी प्रिय सुख प्राप्त करतात. याच प्रमाणे परमेश्‍वराने सर्वांना प्रकाश उष्णता आणि वेगादी गुण देणारा हा जो भौतिक अग्नी रचला आहे, त्यापासून देखील मनुष्यांनी रीती, क्रिया-कौशल्यादी द्वारे उत्तमोत्तम व्यवहार सिद्ध/संपन्न केले पाहिजेत. त्यामुळे उत्तम सुखांची प्राप्ती होणे संभव आहे. या पूर्वीच्या मंत्रात ज्या अग्नीस वृष्टी आदी पदार्थाचा साधक किंवा दाता म्हटले आहे, या मंत्रात त्या अग्नीच्या व्यापकत्व गुणाविषयी विशेष वर्णन केले आहे. ॥17॥
Subject
अग्नी कसा आहे, ते पुढील मंत्रात व्यक्त केले आहे -