Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 11

34 Mantra
2/11
Devata- द्यावापृथिवी देवते Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
उप॑हूतो॒ द्यौष्पि॒तोप॒ मां द्यौष्पि॒ता ह्व॑यताम॒ग्निराग्नी॑ध्रा॒त् स्वाहा॑। दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। प्रति॑ गृह्णाम्य॒ग्नेष्ट्वा॒स्येन॒ प्राश्ना॑मि॥११॥

उप॑हूत॒ इत्युप॑ऽहूतः। द्यौः। पि॒ता। उप॑। माम्। द्यौः। पि॒ता। ह्व॒य॒ता॒म्। अ॒ग्निः। आग्नी॑ध्रात्। स्वाहा॑। दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। प्रति॑। गृ॒ह्णा॒मि॒। अ॒ग्नेः। त्वा॒। आ॒स्ये᳖न। प्र। अ॒श्ना॒मि॒ ॥११॥

Mantra without Swara
उपहूतो द्यौष्पितोप माम्द्यौष्पिता ह्वयतामग्निराग्नीध्रात्स्वाहा । देवस्य त्वा सवितुः प्रसवे श्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् । प्रति गृह्णाम्यग्नेष्ट्वास्येन प्राश्नामि ॥

उपहूत इत्युपऽहूतः। द्यौः। पिता। उप। माम्। द्यौः। पिता। ह्वयताम्। अग्निः। आग्नीध्रात्। स्वाहा। देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। प्रति। गृह्णामि। अग्नेः। त्वा। आस्येन। प्र। अश्नामि॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (घौ:) प्रन्माशमय (दिता) सर्वपालक ईश्‍वर, (उपहूत:) माझ्याद्वारे प्रार्थित तो जगदीश्‍वर (मां) सुखी असलेल्या मला (उपहृयताम्) स्वीकार करो. (आनंदाने मला आपले करी) (द्यौ:) प्रकाशमान (पिता) सर्व उत्तम क्रियांच्या पालक, श्रेष्ठ कार्यांच्या हेतू जो सूर्य, तो (उपहूत:) क्रिया आणि कार्यामधे प्रमुक्त झाल्यानंतर (मां) सुखाचा उपयोग असलेल्या मला (उपहृयताम्) विद्या जाणण्यासाठी प्रेरित करतो. याशिवाय (अग्नि:) जाठराग्नी (स्वाहा) स्वादिष्ट भोजनातील अन्नाचे (आग्नीध्रात) पोटाच्या अन्नाशयामधे पाचन करतो. त्या अन्नामुळे (देवस्य) मला आनंद देणार्‍या ईश्‍वराद्वारे (सनितु:) सर्वांना उत्पन्न करणार्‍या परमेश्‍वराद्वारे उत्पन्न (प्रसवे) या संसारात विद्यमान व सद्य: प्राप्त सुखभोगाचा मी आनंदाने स्वीकार करीत आहे. यासाठी (अश्‍विमो:) प्राणवायू आणि अपानवायूच्या (बाहुभ्यास) आकर्षण आणि धारण या गुणांचा तसेच (पूष्ण:) पुष्टिकाल समान नामक वायूचा (हस्ताभ्याम्) शरीराच्या प्रत्येक अंगात पोहचविण्यार्‍या त्या वायूंच्या गुणांचा (प्रतिगृहृामि) मी उत्तम प्रकारे लाभ घेतो. (अग्ने:) प्रज्वलित अग्नीमधे अन्नास चांगल्या प्रकारे शिजवून (त्वा) जेवणास योग्य अशा त्या अन्नाला (आस्मेत) आपल्या मुखाद्वारे (प्राश्‍नामि) खात आहे, सेवन करीत आहे.
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. मनुष्यांनी आपल्या आत्म्याच्या शुद्धिकरिता अनंत विद्या प्रदाता सर्वांचा परमपिता जो परमात्मा, त्याला आव्हान करावे. त्याची प्रार्थना करावी. तसेच विद्येच्या प्राप्तीकरिता जाठराग्नीला प्रदीप्त करावे. नेत्रांनी अन्नाचे सूक्ष्म निरीक्षण करावे आणि अशा सुसंस्कारित अत्राने योग्य त्या प्रमाणात नित्य भोजन करावे. लक्षात ठेवावे की या जगात सर्व भोग्य पदार्थ ईश्‍वराने उत्न्न केले आहेत. त्या पदार्थांचा उपभोग योग्य त्या रीतीने आणि धर्मयुक्त आचरणानेच घेतला पाहिजे. तसेच इतरांनाही त्या पदार्थांचा उपयोग उचित व धर्ममय रीतीने करण्यास सांगितले पाहिजे. आधीच्या मंत्रात पृथ्वीवर विद्याज्ञानाते प्राप्त होणार्‍या व स्वीकारणीय अशा ज्या पदार्थांचे वर्णन केले आहे, सर्व मनुष्यांनी त्या पदार्थांचा उपयोग धर्ममार्गाने व योग्य रीतीने घेतला पाहिजे. या मंत्राद्वारे हाच अर्थ प्रतिपादित आहे.॥11॥
Subject
पुढील मंत्रात याच अर्थावर भर देऊन तोच अर्थ दृढ केला आहे -