Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 1

34 Mantra
2/1
Devata- यज्ञो देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
कृष्णो॑ऽस्याखरे॒ष्ठोऽग्नये॑ त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑मि॒ वेदि॑रसि ब॒र्हिषे॑ त्वा॒ जुष्टां॒ प्रोक्षा॑मि ब॒र्हिर॑सि स्रु॒ग्भ्यस्त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॒मि॥१॥

कृष्णः॑। अ॒सि॒। आ॒ख॒रे॒ष्ठः। आ॒ख॒रे॒स्थ इत्या॑खरे॒ऽस्थः। अ॒ग्नये॑। त्वा॒। जुष्ट॑म्। प्र। उ॒क्षा॒मि॒। वेदिः॑। अ॒सि॒। ब॒र्हिषे॑। त्वा॒। जुष्टा॑म्। प्र। उ॒क्षा॒मि॒। ब॒र्हिः। अ॒सि॒। स्रु॒ग्भ्य इति स्रु॒क्ऽभ्यः। त्वा॒। जुष्ट॑म्। प्र। उ॒क्षा॒मि॒ ॥१॥

Mantra without Swara
कृष्णोस्याखरेष्ठोग्नये त्वा जुष्टम्प्रोक्षामि वेदिरसि बर्हिषे त्वा जुष्टांम्प्रोक्षामि बर्हिरसि स्रुग्भ्यस्त्वा जुष्टंम्प्रोक्षामि ॥

कृष्णः। असि। आखरेष्ठः। आखरेस्थ इत्याखरेऽस्थः। अग्नये। त्वा। जुष्टम्। प्र। उक्षामि। वेदिः। असि। बर्हिषे। त्वा। जुष्टाम्। प्र। उक्षामि। बर्हिः। असि। स्रुग्भ्य इति स्रुक्ऽभ्यः। त्वा। जुष्टम्। प्र। उक्षामि॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हा यम (आखरेष्ठः) वेदीचे निर्माण करण्यासाठी खणलेल्या स्थानात स्थापित होऊन (कृष्णः) भौतिक अग्नीद्वारे छिन्न होतो म्हणजे सूक्ष्मरूप होतो आणि वायूच्या गुणांनी आकृष्ट (असि) होतो (दूरपर्यंत जातो) भौतिक अग्नीत हवन करण्यासाठी (जुष्टम्) अत्यंत प्रीतीने शुद्ध केलेल्या (त्वा) या यज्ञाला म्हणजे यज्ञावश्यक सामग्रीला (प्रोक्षामि) मी घृत आदी पदार्थांनी सिंचित करून शुद्ध करतो. ही वेदी यज्ञाच्या रूपाने उच्च स्थानास प्राप्त होऊन अंतरिक्षात जाऊन स्थिर होते, मी त्या होम केलेल्या पदार्थांना अंतरिक्षात पाठविण्यासाठी (जुष्टाम्) अत्यंत प्रेमपूर्वक संपादित केलेल्या (त्वा) त्या वेदीला (प्रोक्षामि) घृत आदी पदार्थांद्वारे उत्तम प्रकारे सिंचित करतो, (बर्हिः) जल अंतरिक्षात जाऊन पदार्थांची शुद्धी करते, त्यामुळे (त्वा) त्या जलाची शुद्धी करण्याकरिता शुद्ध केलेला (जुष्टम्) पुष्टी आदी गुणांनी उत्पन्न करणारे हवि आहे, त्या हवीला मी (स्रुग्भ्यः) स्रुवा आदी साधनांनी अग्नीमधे टाकण्यासाठी/आहुती देण्यासाठी (प्रोक्षामि) शुद्ध करतो. ॥1॥
Essence
भावार्थ - ईश्‍वराने उपदेश केला आहे की सर्व मनुष्यांनी यम वेदीचे निर्माण करून, पात्र आदी होम-सामग्री एकत्रित आणून हवीला चांगल्याप्रकारे शुद्ध करावे. अशा प्रकारे अग्नीत आहुती देऊन जो यज्ञ केला जातो, त्यामुळे पावसाचे शुद्ध जल तयार होते. ते शुद्ध जल सर्व ओषधींना पुष्टी देते. (रोगनिवारक शक्ती निर्माण करते) यामुळे यज्ञाचे अनुष्ठान करून सर्व जीवांना नित्य सुखी करणे, हा सर्वांचा परम धर्म आहे. (कर्त्तव्य आहे.) ॥1॥
Subject
इथे द्वितीय अध्याय आरंभ होत आहे ^सर्वजीवांच्या सुखाकरिता परमेश्‍वराने प्रथम अध्यायामधे ज्या जय विद्यांचे वर्णन केले आहे, आता या द्वितीय अध्यायात त्या विद्यांच्या सिद्धी व प्राप्तीकरिता विशेष विद्यांचे प्रकटन केले आहे. या विद्यांपैकी यज्ञवेदी आदी पदार्थांची रचना, या व्यतिरिक्त हस्त-विद्येचे (खानो-पंक्ती) विविध प्रकार याविषयी सांगितले आहे. त्यापैकी यज्ञाच्या सिद्धतेकरिता कोणते साधन असावेत अथवा यज्ञ-सिद्दीचे हेतू कोणते आहेत, या विषयीचे वर्णन प्रथम मंत्रात केले आहे -