Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 95

95 Mantra
19/95
Devata- अश्विनौ देवते Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- निचृज्जगती Swara- निषादः
Mantra with Swara
तेजः॑ पशू॒ना ह॒विरि॑न्द्रि॒याव॑त् परि॒स्रुता॒ पय॑सा सार॒घं मधु॑। अ॒श्विभ्यां॑ दु॒ग्धं भि॒षजा॒ सर॑स्वत्या सुतासु॒ताभ्या॑म॒मृतः॒ सोम॒ऽइन्दुः॑॥९५॥

तेजः॑। प॒शू॒नाम्। ह॒विः। इ॒न्द्रि॒याव॑त्। इ॒न्द्रि॒यव॒दिती॑न्द्रि॒यऽव॑त्। प॒रि॒स्रुतेति॑ प॒रि॒ऽस्रुता॑। पय॑सा। सा॒र॒घम्। मधु॑। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। दु॒ग्धम्। भि॒षजा॑। सर॑स्वत्या। सु॒ता॒सु॒ताभ्या॒मिति॑ सुतासु॒ताभ्या॑म्। अ॒मृतः॑। सोमः॑। इन्दुः॑ ॥९५ ॥

Mantra without Swara
तेजः पशूनाँ हविरिन्द्रियावत्परिस्रुता पयसा सारघं मधु । अश्विभ्यान्दुग्धम्भिषजा सरस्वत्या सुतासुताभ्याममृतः सोम इन्दुः ॥

तेजः। पशूनाम्। हविः। इन्द्रियावत्। इन्द्रियवदितीन्द्रियऽवत्। परिस्रुतेति परिऽस्रुता। पयसा। सारघम्। मधु। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। दुग्धम्। भिषजा। सरस्वत्या। सुतासुताभ्यामिति सुतासुताभ्याम्। अमृतः। सोमः। इन्दुः॥९५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (सुतासुताभ्याम्‌) सिद्ध (अर्थात्‌ तयार) आणि असिद्ध (कच्ची औषधी वनस्पती आदी) द्वारा (भिषजा) एक निष्णात वैद्य (सर्व गुण व प्रभाव प्राप्त करतो) तसेच (अश्विभ्याम्‌) दोन (वेगवेगळ्या शास्त्रांचे) विद्वान (पशूनाम्‌) गौ आदी पशूंपासून (परिस्रुता) प्राप्त होणाऱ्या (पयसा) दुधाद्वारे (तेजः) प्रकाश (वा शक्ती प्राप्त करतात) (इन्द्रियावत्‌) इन्द्रियांना शक्ती देणाऱ्या त्या (आरधम्‌) उत्तम स्वादु व (मधु) मधुर अशा (हविः) भोज्य वा खाद्य पदार्थांपासून (दुग्धम्‌) आणि दुधापासून (सरस्वत्या) एक विदुषी स्त्री (अमृतः) मृत्युपासून रक्षण करणारे (सोमः) ऐश्वर्य प्राप्त करते आणि (इन्दुः) उत्तम स्नेहयुक त पदार्थ (दही, लोणी, तूप आदी) निर्माण करते, तद्वत हे योगसाधका, तुम्ही देखील योगसिद्धी प्राप्त करू शकता ॥95॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे गौचारक गोपालक लोक गौ आदी पशूंचे रक्षण करून दुध आदी पदार्थ प्राप्त करतात आणि परम समाधानी असतात, त्याच प्रमाणे योगीजनांनीदेखील आपल्या मन आणि इन्द्रियाना दुराचारापासून दूर ठेवावे आणि परमानंदात रहावे (हेच त्यांच्याकरिता कल्याणकारी आहे) ॥95॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय -
Footnote
या अध्यायात सोम आदी पदार्थांच्या गुणांचे वर्णन असल्यामुळे या अध्यायाची संगती पूर्वीच्या (अठराव्या) अध्यायाशी त्याच्या अर्थाशी आहे, असे जाणावे.^यजुर्वेदाचा एकोणिसावा अध्याय (मराठी अनुवादासह) समाप्त