Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 90

95 Mantra
19/90
Devata- सरस्वती देवता Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- भुरिक् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अवि॒र्न मे॒षो न॒सि वी॒र्याय प्रा॒णस्य॒ पन्था॑ऽअ॒मृतो॒ ग्रहा॑भ्याम्। सर॑स्वत्युप॒वाकै॑र्व्या॒नं नस्या॑नि ब॒र्हिर्बद॑रैर्जजान॥९०॥

अविः॑। न। मे॒षः। न॒सि। वी॒र्या᳖य। प्रा॒णस्य॑। पन्थाः॑। अ॒मृतः॑। ग्रहा॑भ्याम्। सर॑स्वती। उ॒प॒वाकै॒रित्यु॑प॒ऽवाकैः॑। व्या॒नमिति॑ विऽआ॒नम्। नस्या॑नि। ब॒र्हिः। बद॑रैः। ज॒जा॒न॒ ॥९० ॥

Mantra without Swara
अविर्न मेषो नसि वीर्याय प्राणस्य पन्थमृतो ग्रहाभ्याम् । सरस्वत्युपवाकैर्व्यानन्नस्यानि बर्हिर्बदरैर्जजान् ॥

अविः। न। मेषः। नसि। वीर्याय। प्राणस्य। पन्थाः। अमृतः। ग्रहाभ्याम्। सरस्वती। उपवाकैरित्युपऽवाकैः। व्यानमिति विऽआनम्। नस्यानि। बर्हिः। बदरैः। जजान॥९०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे (ग्रहाभ्याम्‌) सद्गुण ग्रहण करण्यासाठी (पात्र असलेल्या लोकांशी संपर्क करून) एक (सरस्वती) अतिविदुषी स्त्री (उपवाकैः) माणसांना जवळ करणारी कामें (जजान) उत्पत्ती करते (लोकांना आपल्या प्रेमळ आचरणाद्वारे जवळ वा आपलेसे करते) तिचे ते प्रेमळ आचरण (बदरैः) बदरिका फळाप्रमाणे, मधुर असते. त्याचप्रमाणे (एकयोगी) (वीर्याय) वीर्य वा शक्तीप्राप्तीसाठी (नसि) आपल्या नासिकेत (प्राणस्य) प्राणांचे (नियमन करतो) तसेच (अमृतः) अमर वा नित्य अशा (पन्थाः) मार्गाने (वा पद्धतीने) (मेषः) इतरांशी स्पर्धा करणारा (पुढे जाणारा) आणि (अविः) स्वतःचे रक्षण करणारा असतो. (न) (प्राणाप्रमाणेच) तो (व्यानम्‌) सर्व शरीरात व्याप्त व्यान वायूप्रमाणे (नस्यानि) नासिकेत हितकर धातूची (बर्हिः) वृद्धी करणारा असतो. (योगी शरिरातील प्राण व व्यान वायूद्वारे (रस्स, मज्जा, आदी धातूंची वृद्धी करतो म्हणून तो इतरांपेक्षा पुढे जातो) ॥90॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे एक धार्मिक न्यायाधीश (न्यायदानाद्वारे) लोकांचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे प्राणशक्ती सिद्ध केलेला योगी प्राणायामादी द्वारा सर्व दुःखापासून आपले रक्षण करण्यात समर्थ होतो. तसेच ज्याप्रमाणे एक विदुषी माता चांगले ज्ञान व शिक्षण देऊन आपल्या संततीची उन्नती करते, त्याचप्रमाणे योगाच्या आठ अंगांचे अनुष्ठान करून योगी व्यक्ती आपली उन्नती साधतात. ॥90॥
Subject
पुढच्या मंत्रात योगी व्यक्तीच्या कर्त्तव्यांविषयी सांगितलेले आहे -