Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 89

95 Mantra
19/89
Devata- अश्विनौ देवते Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- भुरिक् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒श्विभ्यां॒ चक्षु॑र॒मृतं॒ ग्रहा॑भ्यां॒ छागे॑न॒ तेजो॑ ह॒विषा॑ शृ॒तेन॑। पक्ष्मा॑णि गो॒धूमैः॒ कुव॑लैरु॒तानि॒ पेशो॒ न शु॒क्रमसि॑तं वसाते॥८९॥

अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। चक्षुः॑। अ॒मृत॑म्। ग्रहा॑भ्याम्। छागे॑न। तेजः॑। ह॒विषा॑। शृ॒तेन॑। पक्ष्मा॑णि। गो॒धूमैः॑। कुव॑लैः। उ॒तानि॑। पेशः॑। न। शु॒क्रम्। असि॑तम्। व॒सा॒ते॒ऽइति॑ वसाते ॥८९ ॥

Mantra without Swara
अश्विभ्याञ्चक्षुरमृतङ्ग्रहाभ्याञ्छागेन तेजो हविषा शृतेन । पक्ष्माणि गोधूमैः कुवलैरुतानि पेशो न शुक्रमसितँवसाते ॥

अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। चक्षुः। अमृतम्। ग्रहाभ्याम्। छागेन। तेजः। हविषा। शृतेन। पक्ष्माणि। गोधूमैः। कुवलैः। उतानि। पेशः। न। शुक्रम्। असितम्। वसातेऽइति वसाते॥८९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ग्रहाभ्याम्‌) ग्रहण करणारे बहुभोजी म्हणजे (चांगले ते स्वीकारणाऱ्यासाठी उत्सुक) अशा (अश्विभ्यां) स्त्रीपुरूषांप्रमाणे अन्य विदुषी स्त्रिया आणि विद्वान पुरूष (उतानि) विणलेले मोठे लांब असे (पक्ष्माणि) रेशीम व अन्य तलम वस्त्र (वसाते) पांघरतात (तसे तुम्हीदेखील वापरा) तसेच जसे तुम्ही (सामान्यजन) (छागेन) शेळी आदी पशूंच्या दुधात (शृतेन) शिजविलेले (हविषा) खाण्यास योग्य पदार्थ अथवा होम करण्यास योग्य असे पदार्थ (तयार करता) ते (तेजः) तेजस्विता देतात (अमृतम्‌) तें अमृतरूप असून (चक्षुः) डोळ्यांना उपकारक आहेत (कुवलैः) चांगले (ध्वनी देणारे) ताजे नवीन (गौधूमैः) गव्हाने तयार केलेल्या (शुक्रम्‌) शुद्ध आणि (असितम्‌) काल्या (पेशः) रूपाच्या भोज्य पदार्थाचे विद्वान स्त्रिया व पुरूष सेवन करतात) (न) त्याप्रमाणे इतर गृहस्थजनांनी देखील केले पाहिजे. ॥89॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे शहाणी माणसें प्रिय रूप धारण करतात (चांगले वस्त्र नेसतात) आवडत्या पदार्थांचे भोजन करतात आणि संसाराकरिता आवश्यक सर्व साहत्यि संग्रहीत करतात, तद्वत अन्य गृहस्थ स्त्री-पुरूषांनी केले पाहिजे. ॥89॥
Subject
पुन्हा तोच विषय -