Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 88

95 Mantra
19/88
Devata- सरस्वती देवता Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- स्वराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
मुख॒ꣳ सद॑स्य॒ शिर॒ऽइत् सते॑न जि॒ह्वा प॒वित्र॑म॒श्विना॒सन्त्सर॑स्वती। चप्यं॒ न पा॒युर्भि॒षग॑स्य॒ वालो॑ व॒स्तिर्न शेपो॒ हर॑सा तर॒स्वी॥८८॥

मुख॑म्। सत्। अ॒स्य॒। शिरः॑। इत्। सते॑न। जि॒ह्वा। प॒वित्र॑म्। अ॒श्विना॑। आ॒सन्। सर॑स्वती। चप्य॑म्। न। पा॒युः। भि॒षक्। अ॒स्य॒। वालः॑। व॒स्तिः। न। शेपः॑। हर॑सा। त॒र॒स्वी ॥८८ ॥

Mantra without Swara
मुखँ सदस्य शिरऽइत्सतेन जिह्वा पवित्रमश्विनासन्त्सरस्वती । चप्यन्न पायुर्भिषगस्य वालो वस्तिर्न शेपो हरसा तरस्वी ॥

मुखम्। सत्। अस्य। शिरः। इत्। सतेन। जिह्वा। पवित्रम्। अश्विना। आसन्। सरस्वती। चप्यम्। न। पायुः। भिषक्। अस्य। वालः। वस्तिः। न। शेपः। हरसा। तरस्वी॥८८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (जिह्वा) ज्या जिह्वेद्वारे रसग्रहण केले जाते, (सरस्वती) तसेच ज्याने उत्तम वाणी बोलली जाते, ही स्त्री (पत्नी) त्या मधुर वाणीप्रमाणे आहे. (ह्या पत्नीने पतीसमागमाच्या वेळी) (अस्य) या आपल्या पतीच्या (सतेन) (नासिका, नेत्र, कर्ण) या सुंदर अवयवांनी युक्त (शिरः) आपले शिर पतीच्या शिरासमोर ठेवावे. (आसन्‌) त्याच्या मुखाजवळ आपले (पवित्रम्‌) पवित्र (मुखम्‌) मुख ठेवावे. अशा प्रकारे (अश्विना) गृहस्थाश्रमाचे पालन करणाऱ्या स्त्री पुरूषांनी (इत्‌) वागले पाहिजे. याशिवाय (अस्य) या पतीचा रोगादीपासून (पायुः) रक्षण करणारा (भिषक्‌) वैद्य (जसे आचरण करतो) तसे आणि वंश वृद्धी करण्यासाठी (बालः) एका (न) बालकाची (वस्तिः) वास (म्हणजे वंश स्थापना करणारा पती) (शेपः) आपल्या उपस्थेन्द्रियाद्वारे (हरसा) बलपूर्वक (तरस्वी) प्रयोग करणारा असतो. तो (चप्यम्‌) शांती वा समाधान देणाऱ्या कर्माप्रमाणे (सत्‌) (समागमाच्यावेळी (सत्‌) संतानोत्पत्तीचे कारण होवो. (पतीने समागमक्रियेद्वारे गर्भधारणा करावी) ॥88॥
Essence
भावार्थ - पती-पत्नीच्या हृदयात गर्भाधानावेळी एकमेकाविषयी प्रेमभाव असावा. दोघांनी एकमेकाच्या मुखासमोर मुख डोळ्यांसमोर डोळे असू द्यावेत. मनाशी मनाचा आणि शरीराचा शरीराशी संयोग करून दोघांनी गर्भधानविधी पूर्ण करावा. अशा व्यवहारामुळे त्यांची संतती कुरूप वा विकलांग होणार नाही ॥88॥
Subject
पुनश्च, तोच विषय -