Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 86

95 Mantra
19/86
Devata- सविता देवता Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आ॒न्त्राणि॑ स्था॒लीर्मधु॒ पिन्व॑माना॒ गुदाः॒ पात्रा॑णि सु॒दुघा॒ न धे॒नुः। श्ये॒नस्य॒ पत्रं॒ न प्ली॒हा शची॑भिरास॒न्दी नाभि॑रु॒दरं॒ न मा॒ता॥८६॥

आ॒न्त्राणि॑। स्था॒लीः। मधु॑। पिन्व॑मानाः। गुदाः॑। पात्रा॑णि। सु॒दुघेति॑ सु॒ऽदुघा॑। न। धे॒नुः। श्ये॒नस्य॑। पत्र॑म्। न। प्ली॒हा। शची॑भिः। आ॒स॒न्दीत्या॑ऽस॒न्दी। नाभिः॑। उ॒दर॑म्। न। मा॒ता ॥८६ ॥

Mantra without Swara
आन्त्राणि स्थालीर्मधु पिन्वमाना गुदाः पात्राणि सुदुघा न धेनुः । श्येनस्य पत्रन्न प्लीहा शचीभिरासन्दी नाभिरुदरन्न माता ॥

आन्त्राणि। स्थालीः। मधु। पिन्वमानाः। गुदाः। पात्राणि। सुदुघेति सुऽदुघा। न। धेनुः। श्येनस्य। पत्रम्। न। प्लीहा। शचीभिः। आसन्दीत्याऽसन्दी। नाभिः। उदरम्। न। माता॥८६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - युक्ती (व उपाययोजना जाणणाऱ्या) माणसाने (शचीभिः) उत्तम विचार व श्रेष्ठ कर्म करीत (पद्धती आणि व्यवहाराचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून) (स्थालीः) दाळ आदी पदार्थ शिजविण्याचे पात्र आगीवर ठेऊन त्यात औषधीचा पाक तयार करावा. (पुन्हा त्या पाकप्त) (मधु) मध मिसळून जेवण करावे. (आन्त्राणि) पोटात अन्नपाचन करणाऱ्या आंत्र अथवा नाडीमधे (पिन्वमानाः) जाऊन ते अन्न (पचन होऊन) पुढील सुखासां (गुदाः) गुदा आदी इन्द्रियांपर्यंत जाते (पात्राण) ज्या पात्रात भोजन केले असेल ती पात्रें स्वच्छ करावीत) (सुद्धा) दूध आदी पुष्टिकारक पदार्थ देऊन जी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करते, त्या (धेनुः) गायी (न) प्रमाणे इच्छा पूर्ण करणारा (मानवशरीरात एक अवयव) (प्लीहा) रक्त शुद्ध करणारे आहे, म्हणजे (प्लीहा-पानथरी) या शिवाय (श्येवस्य) श्येन (बहिरीससाणा) पक्ष्याच्या (पत्रम्‌) पंखा (न) प्रमाणे आणि (माता) (न) मातेप्रमाणे शरीरात (आसन्दी) सर्व प्रकारे शरीराला रस पुरविणाऱ्या ज्या (नाभिः) नाभी आणि नाड्या आहेत, त्या (उदरम्‌) पोटाला पुष्ट करतात. (यकृत्‌-प्लीहा, नाडी, हे व इतर अवयव शरीराला अन्नपचन. शुद्धीकरण आणि पोषण या कार्यात साहाय्य करतात) ॥86॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. (श्येनस्य, न आणि माता न, ह्या दोन उपमा आहेत) जे लोक उत्तम प्रकारे तयार केलेल्या शुद्ध पौष्टिक अन्नाचे सेवन करून त्या रसांद्वारे शरीराला नीरोग ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, ते इच्छित सुख प्राप्त करतात ॥86॥
Subject
पुन्हा तोच विषय -