Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 84

95 Mantra
19/84
Devata- सोमो देवता Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
पय॑सा शु॒क्रम॒मृतं॑ ज॒नित्र॒ꣳ सुर॑या॒ मूत्रा॑ज्जनयन्त॒ रेतः॑। अपाम॑तिं दुर्म॒तिं बाध॑माना॒ऽऊव॑ध्यं॒ वात॑ꣳ स॒ब्वं तदा॒रात्॥८४॥

पय॑सा। शु॒क्रम्। अ॒मृत॑म्। ज॒नित्र॑म्। सुर॑या। मूत्रा॑त्। ज॒न॒य॒न्त॒। रेतः॑। अप॑। अम॑तिम्। दु॒र्म॒तिमिति॑ दुःऽम॒तिम्। बाध॑मानाः। ऊव॑ध्यम्। वात॑म्। स॒ब्व᳕म्। तत्। आ॒रात् ॥८४ ॥

Mantra without Swara
पयसा शुक्रममृतठञ्जनित्रँ सुरया मूत्राज्जनयन्त रेतः । अपामतिन्दुर्मतिम्बाधमाना ऊवध्यँवातँ सब्वन्तदारात् ॥

पयसा। शुक्रम्। अमृतम्। जनित्रम्। सुरया। मूत्रात्। जनयन्त। रेतः। अप। अमतिम्। दुर्मतमिति दुःऽमतिम्। बाधमानाः। ऊवध्यम्। वातम्। सब्वम्। तत्। आरात्॥८४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे विद्वान (विचारशील) माणसें आपल्या (अमतिम्‌) बुद्धीच्या निर्बलतेला आणि (दुर्मतिम्‌) दुष्ट विचारांना (अप, बाधमानाः) दूर करण्यासाठी (ऊवध्यम्‌) कापणे, तोडणें यासाठी उपयुक्त (कुऱ्हाडी, कोयता, खुरपें आदी) साधनांप्रमाणे (वातम्‌) विद्यमान (सव्वम्‌) सर्व पदार्थात असणाऱ्या (पयसा) जलाचा (उपयोग करतात) (ते उत्तम संतानाला जन्म देतात) त्याच प्रमाणे जे लोक (सुरया) सोमलता आदी औषधींच्या रसाचे सेवन करून (वीर्य वाढवतात) आणि (मूत्रात्‌) मूत्रेंद्रियातून (जनित्रम्‌) संतानोपत्तीचे कारण असलेल्या (अमृतम्‌) अकालमृत्यू आणि रोग यांचे निवारण करण्यास समर्थ असलेल्या (शुक्रम्‌) शुद्ध (रेतः) वीर्याचे रक्षण करतात (तत्‌) आणि त्या वीर्याच्या (आरात्‌) साहाय्याने (जनयन्त) संततीला जन्म देतात, त्यांची मुलें दीर्घायू होऊन ते वीर्यवान लोक प्रजावान होतात ॥84॥
Essence
भावार्थ - जी माणसें दुर्गुणांचा आणि दुर्जनांचा संग त्यागून व्यभिचाराचापासून दूर राहतात आणि अशाप्रकारे वीर्याचे रक्षण करून श्रेष्ठ संतती उत्पन्न करतात, तीच माणसें आपल्या वंशाचे कीर्ती वाढवितात. ॥84॥
Subject
मनुष्याने आपल्या कुळाला श्रेष्ठ बनविले पाहिजे, याविषयी -