Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 8

95 Mantra
19/8
Devata- सोमो देवता Rishi- आभूतिर्ऋषिः Chhand- निचृत पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्याश्वि॒नं तेजः॑ सारस्व॒तं वी॒र्यमै॒न्द्रं बल॑म्। ए॒ष ते॒ योनि॒र्मोदा॑य त्वान॒न्दाय॑ त्वा॒ मह॑से त्वा॥८॥

उ॒प॒या॒मगृ॑हीतः। अ॒सि॒। आ॒श्वि॒नम्। तेजः॑। सा॒र॒स्व॒तम्। वी॒र्य᳖म्। ऐ॒न्द्रम्। बल॑म्। ए॒षः। ते॒। योनिः॑। मोदा॑य। त्वा॒। आ॒न॒न्दायेत्या॑ऽऽन॒न्दाय॑। त्वा॒। मह॑से। त्वा॒ ॥८ ॥

Mantra without Swara
उपयामगृहीतो स्याश्विनन्तेजः सारस्वतँवीर्यऐन्द्रम्बलम् । एष ते योनिर्मादाय त्वानन्दाय त्वा महसे त्वा ॥

उपयामगृहीतः। असि। आश्विनम्। तेजः। सारस्वतम्। वीर्यम्। ऐन्द्रम्। बलम्। एषः। ते। योनिः। मोदाय। त्वा। आनन्दायेत्याऽऽनन्दाय। त्वा। महसे। त्वा॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजा आणि हे प्रजाजन तुम्ही दोघे (उपयामगृहीतः) यम-नियमयुक्त धर्माने युक्त (असि) आहात (राजा व प्रजा दोघांनी यम-नियमांचे पालन करावे) (ते) तुमचे (एषः) हे जे (योनिः) गर आहे, त्यात (आश्विनम्‌) सूर्य आणि चंद्राप्रमाणे (तेजः) तीव्र तसेच कोमल (सूर्याचे तीव्र व चंद्राचे शीतल व शांत तेज असावे) (सारस्वतम्‌) घरात विज्ञानमयवाणीचे (वीर्यम्‌) तेज असावे (ऐन्द्रम्‌) विद्युतेप्रमाणे (बलम्‌) बळ असावे. (त्वा) तुम्हाला (मोदाय) आनंद प्राप्तीसाठी तसेच (त्वा) तुम्हाला हर्ष प्राप्तीसाठी आणि (त्वा) तुम्हाला (महसे) महान पराक्रम करण्यासाठी सर्व लोकांनी स्वीकारावे. (प्रजेने राजा व विद्वान प्रजाजनाकडे आनंद, उल्हास प्राप्त करण्यासाठी गेले पाहिजे) ॥8॥
Essence
भावार्थ - जे लोक सूर्य आणि चंद्र यांच्याप्रमाणे तेजस्वी असतात, ते विद्यावान व पराक्रमी असतात आणि विद्युतेप्रमाणे अत्यंत शक्तिमान होऊन स्वतः सुखी होतात आणि इतरांनाही आनंद देतात. आप्रकारे ते परमानंदांचा अनुभव घेतात. ॥8॥
Subject
मनुष्यांनी काय केले पाहिजे, याविषयी -