Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 77

95 Mantra
19/77
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- अतिशक्वरी Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दृ॒ष्ट्वा रू॒पे व्याक॑रोत् सत्यानृ॒ते प्र॒जाप॑तिः। अश्र॑द्धा॒मनृ॒तेऽद॑धाच्छ्र॒द्धा स॒त्ये प्र॒जाप॑तिः। ऋ॒तेन॑ स॒त्यमि॑न्द्रि॒यं वि॒पान॑ꣳ शु॒क्रमन्ध॑स॒ऽइन्द्र॑स्येन्द्रि॒यमि॒दं पयो॒ऽमृ॒तं मधु॑॥७७॥

दृ॒ष्ट्वा। रू॒पेऽइति॑ रू॒पे। वि। आ। अ॒क॒रो॒त्। स॒त्या॒नृ॒ते इति॑ सत्यऽअनृ॒ते। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। अश्र॑द्धाम्। अनृ॑ते। अद॑धात्। श्र॒द्धाम्। स॒त्ये। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। ऋ॒तेन॑। स॒त्यम्। इ॒न्द्रि॒यम्। वि॒पान॒मिति॑ वि॒ऽपान॑म्। शु॒क्रम्। अन्ध॑सः। इन्द्र॑स्य। इ॒न्द्रि॒यम्। इ॒दम्। पयः॑। अ॒मृत॑म्। मधु॑ ॥७७ ॥

Mantra without Swara
दृष्ट्वा रूपे व्याकरोत्सत्यानृते प्रजापतिः । अश्रद्धामनृते दधाच्छ्रद्धाँ सत्ये प्रजापतिः । ऋतेन सत्यमिन्द्रियँविपानँ शुक्रमन्धसऽइन्द्रस्येन्द्रियमिदम्पयोमृतम्मधु ॥

दृष्ट्वा। रूपेऽइति रूपे। वि। आ। अकरोत्। सत्यानृते इति सत्यऽअनृते। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। अश्रद्धाम्। अनृते। अदधात्। श्रद्धाम्। सत्ये। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। ऋतेन। सत्यम्। इन्द्रियम्। विपानमिति विऽपानम्। शुक्रम्। अन्धसः। इन्द्रस्य। इन्द्रियम्। इदम्। पयः। अमृतम्। मधु॥७७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजापतिः) सर्व लोकांच्या रक्षक परमेश्वराने (ऋतेन) आपल्या यथार्थ सत्य ज्ञानाद्वारे (सत्यानृते) सत्य आणि असत्य (सत्य काय नि असत्य काय) याचे (रूपे) निरूपण केले आहे. त्यांना (दृष्ट्‌वा) आपल्या ज्ञानदृष्टीने पाहून परमेश्वर (व्याकरोत्‌) मनुष्यांना विविध मार्गांनी उपदेश करतो (जे खरें आहे तेच करावे, खोटें करूं नये, याची प्रेरणा देत असतो) तसेच परमेश्वर (अनृते) मिथ्याभाषण आदी दुर्ष्कांविषयी (माणसाच्या मनात) (अश्रद्धाम्‌) अप्रीती (अदधात्‌) उत्पन्न करतो. आणि (सत्ये) सत्याविषयी (श्रद्धाम्‌) प्रीती उत्पन्न करतो. तसेच परमेश्वर (अन्धसः) अधर्माचरणापासून माणसाला निवृत्त करतो. तो (शुक्रम्‌) (हृदयाची) शुद्धी करणारा आणि (विपानम्‌) रक्षणाची साधनें देणारा असून (सत्यम्‌) सत्यस्वरूप आहे. तोच (इन्द्रियम्‌) चित्ताला धीर देणारा, आणि (इन्द्रस्य) परमैश्वर्य प्राप्त करविणारा आहे. (इदम्‌) असा हा (पयः) अमृतरूप सुखदायक (अमृतम्‌) मृत्यु व रोगापासून मुक्ती देणारा (मधु) माननीय (वा मधाप्रमाणे प्रिय) (इन्द्रियम्‌) विशेष ज्ञानप्राप्ती देणारा (प्रजापतिः) परमेश्वरच सर्वांचा उपास्यदेव आहे (सर्व मनुष्यांनी त्याचीच उपासना करावी) ॥77॥
Essence
भावार्थ - जे लोक ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे धर्माचरण करतात आणि ईश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या अधर्माचा अवलंब करीत नाहीत, ते सुखी होतात. जर ईश्वराने धर्म काय आणि अधर्म काय, याचे ज्ञान मनुष्यास दिले नसते, तर धर्म-अधर्म यांच्या स्वरूपाचे ज्ञान कुणालाही झाले नसते. तसेच जी माणसें आपल्या आत्म्याच्या अनुकुल आचरण करतात आणि अंतःकरणाच्या विरूद्ध अशा आचरणाचा त्याग करतात, तेच धर्म आणि अधर्म याविषयी भेद करू शकतात (वा त्यांनाच धर्म काय नि अधर्म काय, हे कळते) इतर लोक हा भेद जाणू शकत नाहीत. ॥77॥
Subject
आता धर्म काय, अधर्म काय, याविषयी -