Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 71

95 Mantra
19/71
Devata- इन्द्रो देवता Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒पां फेने॑न॒ नमु॑चेः॒ शिर॑ऽइ॒न्द्रोद॑वर्त्तयः। विश्वा॒ यदज॑यः॒ स्पृधः॑॥७१॥

अ॒पाम्। फेने॑न। नमु॑चेः। शिरः॑। इ॒न्द्र॒। उत्। अ॒व॒र्त्त॒यः॒। विश्वाः॑। यत्। अज॑यः। स्पृधः॑ ॥७१ ॥

Mantra without Swara
अपाम्फेनेन नमुचेः शिर इन्द्रोदवर्तयः । विश्वा यदजय स्पृधः ॥

अपाम्। फेनेन। नमुचेः। शिरः। इन्द्र। उत्। अवर्त्तयः। विश्वाः। यत्। अजयः। स्पृधः॥७१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या सेनापती, ज्याप्रमाणे सूर्य (अपाम्‌) मेघातील पाणी (फेनेन) फार वाढते (ढगात पाणी भरपूर असते पण) (नमुचेः) मेघ पाणी सोडत नाही (वृष्टी करत नाही), तेव्हा (सूर्यः) सूर्य त्या (शिरः) दाट ढगांना भेदून पाऊस पडतो, तद्वत हे सेनापती, आपणदेखील आपल्या सैन्याला (उदवर्त्तय) उत्तमाहून उत्तम करा आणि (विश्वाः) संपूर्णतः (स्पृधः) तुमच्याशी स्पर्धा वा युद्ध करणारी (यत) जी शत्रुसेना असेल, तिला (अजयः) पराजित करून विजय प्राप्त करा ॥71॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्याला आच्छादित करणारे मेघ वारंवार उठतात (आणि सूर्याला झाकाळून टाकतात, पण शेवटी सूर्य मेघांवर विजय मिळवतो) तद्वत शत्रूदेखील वारंवार उठाव करतात. (आणि सेनापती सूर्याप्रमाणे त्यांचा पराभव करतो) शत्रू जोपर्यंत पाहतात की त्यांचे बळ कमी आहे आणि विरोधी पक्षाचे बळ अधिक आहे, तोपर्यंत शांत राहतात. (पण शत्रूपक्षाची शक्ती वाढली की तो पक्ष केव्हाही आक्रमण करू शकतो, हे सेनाधीशाने ध्यानी ठेवावे.) ॥7॥।
Subject
आता पुढील मंत्रात सांगितले आहे की राष्ट्राचा सेनापती कसा असावा -