Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 70

95 Mantra
19/70
Devata- पितरो देवताः Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
उ॒शन्त॑स्त्वा॒ नि धी॑मह्यु॒शन्तः॒ समि॑धीमहि। उ॒शन्नु॑श॒तऽआ व॑ह पि॒तॄन् ह॒विषे॒ऽअत्त॑वे॥७०॥

उ॒शन्तः॑। त्वा॒। नि। धी॒म॒हि॒। उ॒शन्तः॑। सम्। इ॒धी॒म॒हि॒। उ॒शन्। उ॒श॒तः। आ। व॒ह॒। पि॒तॄन्। ह॒विषे॑। अत्त॑वे ॥७० ॥

Mantra without Swara
उशन्तस्त्वा नि धीमह्युशन्तः समिधीमहि । उशन्नुशतऽआवह पितऋृन्हविषेऽअत्तवे ॥

उशन्तः। त्वा। नि। धीमहि। उशन्तः। सम्। इधीमहि। उशन्। उशतः। आ। वह। पितॄन्। हविषे। अत्तवे॥७०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अध्यापकगण वा पिता म्हणतात) विद्या शिकण्यासाठी इच्छुक हे विद्यार्थी अथवा हे पुत्रा, तुझ्या (कल्याणाची) (उशन्तः) कामना करणारे आम्ही (तुझे शिक्षक वा तुझा पिता) (त्वा) तुला (नि, धीमहि) विद्येचा निधी करू इच्छितो. (उशन्तः) तुझ्या विद्वत्तेच्या वृद्धीची कामना करीत आम्ही तुला (समिधीमहि) उत्तम कोटिची विद्या देऊन प्रशंसनीय करू. (उशन्‌) (आमच्या प्रमाणे) तू देखील (स्वकल्याणाची) कामना करीत (हविषे) भोज्य पदार्थ (अत्तवे) खाण्याची (उशतः) कामना कर (शिष्य व शिक्षक यांनी उत्तम जेवण मिळून करावे) अशाप्रकारे आपण दोघे (पितॄन्‌) पितरांना (अन्य वयोवृद्ध ज्ञानवृद्धजनांना) (आ, वह) चांगल्याप्रकारे प्राप्त होऊ (त्यांचीही योग्यप्रमाणात सेवा-सत्कार करू) ॥70॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे विद्वांन लोकांची इच्छा असते की त्यांना बुद्धिमान, जितेन्द्रिय, कृतज्ञ, परिश्रमी आणि विरचशील विद्यार्थी मिळावेत, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचीही इच्छा असावी की त्यांनी उत्तम विद्वान अध्यापकांची सेवा करीत त्यांच्याकडून विद्या ग्रहण करावी ॥70॥
Subject
पुन्हा तोच विषय -