Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 61

95 Mantra
19/61
Devata- पितरो देवता Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒ग्नि॒ष्वा॒त्तानृ॑तु॒मतो॑ हवामहे नाराश॒ꣳसे सो॑मपी॒थं यऽआ॒शुः। ते नो॒ विप्रा॑सः सु॒हवा॑ भवन्तु व॒य स्या॑म॒ पत॑यो रयी॒णाम्॥६१॥

अ॒ग्नि॒ष्वा॒त्तान्। अ॒ग्नि॒स्वा॒त्तानित्य॑ग्निऽस्वा॒त्तान्। ऋ॒तु॒मत॒ इत्यृ॑तु॒ऽमतः॑। ह॒वा॒म॒हे॒। ना॒रा॒श॒ꣳसे। सो॒म॒पी॒थमिति॑ सोमऽपी॒थम्। ये। आ॒शुः। ते। नः॒। विप्रा॑सः। सु॒हवा॒ इति॑ सु॒ऽहवाः॑। भ॒व॒न्तु॒। व॒यम्। स्या॒म॒। पत॑यः। र॒यी॒णाम्। ॥६१ ॥

Mantra without Swara
अग्निष्वात्ताँऽऋतुमतो हवामहे नाराशँसे सोमपीथँयऽआशुः । ते नो विप्रासः सुहवा भवन्तु वयँस्याम पतयो रयीणाम् ॥

अग्निष्वात्तान्। अग्निस्वात्तानित्यग्निऽस्वात्तान्। ऋतुमत इत्यृतुऽमतः। हवामहे। नाराशꣳसे। सोमपीथमिति सोमऽपीथम्। ये। आशुः। ते। नः। विप्रासः। सुहवा इति सुऽहवाः। भवन्तु। वयम्। स्याम। पतयः। रयीणाम्।॥६१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ये) जे (सोमपीथम्‌) सोम आदी उत्तम रसाचे (आशुः) सेवन करतात, आणि जे (ऋतुमतः) मनोहर वसंत आदी ऋतूत (यज्ञ आदी) उत्तम कर्म करणारे, तसेच (अग्निष्वात्तान्‌) चांगल्या प्रकारे अग्निविद्या जाणणारे आमचे पिता आदी ज्ञानी लोक आहेत, त्यांना (आम्ही संताने) (नाराशंसे) ज्यात विद्वानांचा सत्कार व प्रशंसा केली जाते, अशा कार्यक्रमात (हवामहे) बोलावतो (आणि सत्कारादीद्वारा त्यांना प्रसन्न करतो (ते) ते (विप्रासः) बुद्धिमान लोक (नः) आम्हाला (सुहवाः) श्रेष्ठ (विद्या, ज्ञान आदी) दान देणारे (भवन्तु) असोत आणि त्यांच्या कृपेने (वयम्‌) आम्ही (त्यांची मुलें, नातवंडे आदी) (रयीणाम्‌) धन-संपत्तीचे (पतयः) स्वामी (स्याम) व्हावेत (अशी आम्ही कामना करतो) ॥61॥
Essence
भावार्थ - जे पदार्थ विद्येचे ज्ञाता आहेत, देश, काल, परिस्थिति जाणतात, उत्तम हितकर औषधीचे सेवन करतात, तसेच ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध पिता आदी ज्येष्ठ वयस्कर विद्वान आहेत, संतानांनी सत्कारादी कार्यासाठी त्यांना निमंत्रित केले पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शन व सहाय्याने धनादी ऐश्वर्याचे स्वामी व्हायला हवे ॥61॥
Subject
माता-पिता व संतानांनी एकमेकाशी कसे वागावे, याविषयी -