Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 6

95 Mantra
19/6
Devata- इन्द्रो देवता Rishi- आभूतिर्ऋषिः Chhand- विराट् प्रकृतिः Swara- धैवतः
Mantra with Swara
कु॒विद॒ङ्ग यव॑मन्तो॒ यवं॑ चि॒द्यथा॒ दान्त्य॑नुपू॒र्वं वि॒यूय॑। इ॒हेहै॑षां कृणुहि॒ भोज॑नानि॒ ये ब॒र्हिषो॒ नम॑ऽ उक्तिं॒ यज॑न्ति। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒श्विभ्यां॑ त्वा॒ सर॑स्वत्यै॒ त्वेन्द्रा॑य त्वा सु॒त्राम्ण॑ऽए॒ष ते॒ योनि॒स्तेज॑से त्वा वी॒र्याय त्वा॒ बला॑य त्वा॥६॥

कु॒वित्। अ॒ङ्ग। यव॑मन्त॒ इति॒ यव॑ऽमन्तः। यव॑म्। चि॒त्। यथा॑। दान्ति॑। अ॒नु॒पू॒र्वमित्य॑नुऽपू॒र्वम्। वि॒यूयेति॑ वि॒ऽयूय॑। इ॒हेहेती॒हऽइ॒ह। ए॒षा॒म्। कृ॒णु॒हि॒। भोज॑नानि। ये। ब॒र्हिषः॑। नम॑उक्ति॒मिति॒ नमः॑ऽउक्तिम्। यज॑न्ति। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। त्वा॒। सर॑स्वत्यै। त्वा॒। इन्द्रा॑य। त्वा॒। सु॒त्राम्ण॒ इति॑ सु॒ऽत्राम्णे॑। ए॒षः। ते॒। योनिः॑। तेज॑से। त्वा॒। वी॒र्या᳖य। त्वा॒। बला॑य। त्वा॒ ॥६ ॥

Mantra without Swara
कुविदङ्ग यवमन्तो वयञ्चिद्यथा दान्त्यनुपूर्वँवियूय । इहेहैषाङ्कृणुहि भोजनानि ये बर्हिषो नमउक्तिँयजन्ति । उपयामगृहीतो स्यश्विभ्यान्त्वा सरस्वत्यै त्वेन्द्राय त्वा सुत्राम्णेऽएष ते योनिस्तेजसे त्वा वीर्याय त्वा बलाय त्वा ॥

कुवित्। अङ्ग। यवमन्त इति यवऽमन्तः। यवम्। चित्। यथा। दान्ति। अनुपूर्वमित्यनुऽपूर्वम्। वियूयेति विऽयूय। इहेहेतीहऽइह। एषाम्। कृणुहि। भोजनानि। ये। बर्हिषः। नमउक्तिमिति नमःऽउक्तिम्। यजन्ति। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। त्वा। सरस्वत्यै। त्वा। इन्द्राय। त्वा। सुत्राम्ण इति सुऽत्राम्णे। एषः। ते। योनिः। तेजसे। त्वा। वीर्याय। त्वा। बलाय। त्वा॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (कोणी विद्वान, राजपुरुषाला उद्देशून म्हणाले आहे) हे (अङ्ग) मित्र विद्वान, (बर्हिषः) अन्न-धान्यादी पदार्थांची प्राप्ती करून देणारे (ये) जे (यवमन्तः) यव आदी धान्यांचा संग्रह करणारे कृषजन आहेत, ते (नमउक्तिम्‌) धान्याच्या वृद्धीविषयी आम्हाला-तुम्हाला (यजन्ति) उपदेश करतात वा महति सांगतात (एषाम्‌) त्यानी दिलेल्या पदार्थांचा तुम्ही (इहेह) या संसारात वा प्रापंचिक कार्यात (भोजनानि) भोजनासाठी वा परिवाराच्या पालन कर्मासाठी (कृणुहि) उपयोग करा. हे कृषक (यथा) ज्याप्रमाणे (यवम्‌) जव या धान्याला (चित्त) देखील (वियूय) भुसापासून वेगळे करून (अनुपूर्वम्‌) पूर्वापर पद्धतीने (एकानंतर एक याप्रमाणे) (दान्ति) काढतात, तद्वत तुम्ही या धान्याने (कुवित्‌) अधिक शक्ती प्राप्त करा कारण की (ते) तुमची उन्नतीचे (योनिः) कारण (एषः) हे धान्य (वा यापासून तयार झालेले अन्न आहे) हे राजपुरूष, (त्वा) तुम्हाला जे लोक (अश्विभ्याम्‌) प्रकाश आणि भूमी या विषयीचे ज्ञान देण्यासाठी आणि (त्वा) तुम्हाला (सरस्वत्यै) कृषिकर्म उत्कृष्टपणे करण्यास शिकविण्यासाठी (प्रयत्न करतात आणि या प्रकारे जे लोक तुम्हाला आनंदित करतात, त्यांच्याशी तुम्हीही उचित व्यवहार करा) तसेच (त्वा) तुम्हाला जे लोक (इन्द्राय) शत्रूंचा नाश करणारे असून (सुत्राम्णे) रक्षण करणारे आहेत आरि जे (त्वा) तुम्हाला (तेजसे) तेजस्वी करणारे आहेत (त्याच्याशी तुम्ही उचित व्यवहार करा.) तसेच जे लोक (त्वा) तुम्हाला (वीर्याय) पराक्रमी होण्यासाठी आणि (त्वा) तुम्हाला (बलाय) शक्तीमान होण्यासाठी प्रयत्न करतात व आनंदित करतात, तुम्ही देखील (उपयामगृहीतः) त्यांच्याशी श्रेष्ठ व्यवहार करा म्हणजे तेही तुमच्याशी तसे उचित आचरण करतील आणि तुम्ही (असि) देखील कृतज्ञ व्हाल. ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. जे राजपुरूष कृषी (वाणिज्य, उद्योग-धंदे) आदी कार्य करणारे आहेत. तसेच राज्याला कर देणारे आहेत आणि जे श्रम करणाऱ्या (मजूर, कारागीर, शिल्पी) आदी लोकांशी प्रेमाने वागतात, त्यांना योग्य तो उपदेश (सल्ला व मार्गदर्शन) करतात, ते राजपुरूष या जगात सौभाग्यशाली ठरतात. ॥6॥
Subject
राजपुरुषांनी काय केले पाहिजे, या विषयी -