Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 49

95 Mantra
19/49
Devata- पितरो देवताः Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
उदी॑रता॒मव॑र॒ऽउत्परा॑स॒ऽउन्म॑ध्य॒माः पि॒तरः॑ सो॒म्यासः॑। असुं॒ यऽई॒युर॑वृ॒काऽऋ॑त॒ज्ञास्ते नो॑ऽवन्तु पि॒तरो॒ हवे॑षु॥४९॥

उत्। ई॒र॒ता॒म्। अव॑रे। उत्। परा॑सः। उत्। म॒ध्य॒माः। पि॒तरः॑। सो॒म्यासः॑। असु॑म्। ये। ई॒युः। अ॒वृ॒काः। ऋ॒त॒ज्ञा इत्यृ॑त॒ऽज्ञाः। ते। नः॒। अ॒व॒न्तु॒। पि॒तरः॑। हवे॑षु ॥४९ ॥

Mantra without Swara
उदीरतामवर उत्परास उन्मध्यमाः पितरः सोम्यासः । असुँयऽईयुरवृकाऽऋतज्ञास्ते नोवन्तु पितरो हवेषु ॥

उत्। ईरताम्। अवरे। उत्। परासः। उत्। मध्यमाः। पितरः। सोम्यासः। असुम्। ये। ईयुः। अवृकाः। ऋतज्ञा इत्यृतऽज्ञाः। ते। नः। अवन्तु। पितरः। हवेषु॥४९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वीर सैनिक वा इच्छा व्यक्त करीत आहेत) लोकहो, (ये) जे (अवृकाः) चौर्य आदी दुष्कर्म न करणारे आणि (ऋतज्ञाः) सत्य जाणणारे आमचे (पितरः) पिता आदी वयोवृद्धजन आहेत, त्यानी (आम्हा-सैनिकांना वा युवकांना) (हवेषु) युद्ध अथवा संकट प्रसंगी (असुम्‌) प्राणशक्ती म्हणजे (उत्साह व प्रेरणा देत) (उदीयुः) आमच्याजवळ असावे. (ते) त्यांनी (नः) आमची (उत्‌, अवन्तु) सर्वप्रकारे रक्षा करावी. तसेच जे (सोम्यासः) शांतगुणादीसंपन्न (अवरे) प्रथम (वा सामान्य कोटीचे) आहेत, अथवा जे (परास) उत्कृष्ट अथवा जे (मध्यमाः) मध्यम कोटीचे विद्वान असलेले (पितरः) पिता आदी वयस्कर मंडळी आहेत, त्यांनी आम्हा (युवकांना) युद्ध करण्यास अथवा उत्तम कर्म करण्यास (उदीरताम्‌) प्रेरित करावे (अशी आम्ही इच्छा करतो) ॥49॥
Essence
भावार्थ - जे विजय अथवा सुयश प्राप्त केलेले विद्वान आहेत, त्यापैकी काही प्रथम, काही मध्यम तर काही उत्तम कोटीचे आहेत, अशा चौर्य आदी दोषांपासून दूर असलेल्या विद्या जाणणाऱ्या तत्त्वज्ञानाचे विद्वान, लोकांनी इतरांना विद्याभ्यास करवावा, उपदेशाद्वारे त्याना सत्यधर्म धारक करावे आणि त्या लोकांना बाल्यावस्तेत विवाह करण्यापासून परावृत्त करावे (पूर्ण युवावस्था प्राप्त झाल्यानंतरच विवाहाची अनुमती द्यावी ॥49॥
Subject
पित्याने कसे वागावे, काय केले पाहिजे, याविषयी -