Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 47

95 Mantra
19/47
Devata- पितरो देवताः Rishi- वैखानस ऋषिः Chhand- स्वराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
द्वे सृ॒तीऽअ॑शृणवं पितॄ॒णाम॒हं दे॒वाना॑मु॒त मर्त्या॑नाम्। ताभ्या॑मि॒दं विश्व॒मेज॒त्समे॑ति॒ यद॑न्त॒रा पि॒तरं॑ मा॒तरं॑ च॥४७॥

द्वेऽइति॒ द्वे। सृ॒तीऽइति॑ सृ॒ती। अ॒शृ॒ण॒व॒म्। पि॒तॄ॒णाम्। अ॒हम्। दे॒वाना॑म्। उ॒त। मर्त्या॑नाम्। ताभ्या॑म्। इ॒दम्। विश्व॑म्। एज॑त्। सम्। ए॒ति॒। यत्। अ॒न्त॒रा। पि॒तर॑म्। मा॒तर॑म्। च॒ ॥४७ ॥

Mantra without Swara
द्वे सृतीऽअशृनवम्पितऋृणामहन्देवानामुत मर्त्यानाम् । ताभ्यामिदँविश्वमेजत्समेति यदन्तरा पितरम्मातरञ्च ॥

द्वेऽइति द्वे। सृतीऽइति सृती। अशृणवम्। पितॄणाम्। अहम्। देवानाम्। उत। मर्त्यानाम्। ताभ्याम्। इदम्। विश्वम्। एजत्। सम्। एति। यत्। अन्तरा। पितरम्। मातरम्। च॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अहम्‌) मी (एक तत्त्वज्ञानी मनुष्य हे जाणतो की) (पितॄणाम्‌) पिता आदीची (च) आणि (देवानाम्‌) विद्वानांची, अशा (द्वे) दोन गती आहेत (या दोन गती वा अवस्थेत) सृती) ज्यामधे (पिता व विद्वान) येतात-जातात म्हणजे जन्मतात आणि मरतात, (या विषयी तत्त्वज्ञानी माणूस) मी (अश्रृणवम्‌) ऐकले आहेत (ते तुम्हीही जाणून घ्या) (ताभ्याम्‌) त्या दोन गतीमधूनच (इदम्‌) हे (विश्वम्‌) सर्व जग (एजत्‌) चालत असून (समेति) नियम आणि व्यवस्थेत चालत आहे. (उत) आणि (दुसरी ती गती की) (यत) जी (पितरम्‌) पित्यापासून आणि (मातरम्‌) मातेपासून (अन्तरा) पृथक होते-म्हणजे दुसऱ्या शरीराच्या रूपाने दुसऱ्या आईवडिलापासून जन्म मिळतो. तुम्ही हे सत्य जाणून घ्या. ॥47॥
Essence
भावार्थ - जीवात्म्याच्या दोन गती (वा अवस्था) आहेत. एक गती ती की जी माता-पित्यापासून जन्म होऊन जीव या संसारात विषय-सुख भोगतो आणि दुसरी गती म्हणजे विद्वज्जनांच्या संगतीत राहून मुक्ति-सुख उपभोगणें. या दोन गती वा अवस्थेतच सर्व प्राणी संचार वा येणे-जाणे करतात. (म्हणजे कर्मफळ भोगण्यासाठी जन्म मिळणे, जीवाची ही एक गती, आणि कर्मक्षय होऊन मुक्त अवस्थेत असणे, ही दुसरी गती) ॥47॥
Subject
जीवांचे दोन मार्ग आहेत, याविषयी -