Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 46

95 Mantra
19/46
Devata- श्रीर्देवता Rishi- वैखानस ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ये स॑मा॒नाः सम॑नसो जी॒वा जी॒वेषु॑ माम॒काः। तेषा॒ श्रीर्मयि॑ कल्पता॒मस्मिँल्लो॒के श॒तꣳ समाः॑॥४६॥

ये। स॒मा॒नाः। सम॑नस॒ इति॒ सऽम॑नसः। जी॒वाः। जी॒वेषु॑। मा॒म॒काः। तेषा॑म्। श्रीः। मयि॑। क॒ल्प॒ता॒म्। अ॒स्मिन्। लो॒के। श॒तम्। समाः॑ ॥४६ ॥

Mantra without Swara
ये समानाः समनसो जीवा जीवेषु मामकाः । तेषाँ श्रीर्मयि कल्पतामस्मिँलोके सतँसमाः ॥

ये। समानाः। समनस इति सऽमनसः। जीवाः। जीवेषु। मामकाः। तेषाम्। श्रीः। मयि। कल्पताम्। अस्मिन्। लोके। शतम्। समाः॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पुत्र इच्छा व्यक्त करीत आहे) (अस्मिन्‌) या (लोके) लोकात (जगात वा या घरात) (जीवेषु) जिवंत असलेल्या पैकी (ये) जे (समानाः) समान गुण, कर्म, स्वभाव असलेले आणि (समनसः) समान विचार वा मत असणारे (मामकः) माझे (जीवाः) जीवित पिता (काका, आजोबा, पणजोबा, अग्रज) आदी (घरातील) सदस्य आहेत, (तेषाम्‌) त्यांची (श्रीः) लक्ष्मी (धन भूमी आदी) (मयि) माझ्याजवळ (शतम्‌) (समाः) शंभर वर्षापर्यंत (कल्पताम्‌) असावी. (माझे पिता, पितामह आदी दीर्घजीवी व्हावेत. त्यांच्यासह मी संपदेचा योग्य उपयोग घेत शतायू व्हावे, अशी मनीषा मी (एक युवा पुत्र मनात बाळगतो) ॥46॥
Essence
भावार्थ - आई-वडील जिवंत असतांना मुला-मुलींनी त्यांची सेवा अवश्य करावी. जे पुत्र पिता आदींची सेवा करतात, ते सत्काराचे पात्र ठरतात, तसेच पिता आदींची जे धन आदी पदार्थ असतील, ते पुत्रासाठी (त्यांच्या उपयोगासाठी) असावे, तसेच जी धन-संपत्ती मुलांची असेल, त्याचा उपयोग करण्याचा अधिकार वडिलांना असावा. (अर्थात वडील, व मुलगा यांनी आपापल्या धन-संपत्तीत एकमेकाला सहभागी करून घ्यावे वा एकमेकास उपयोग करू द्यावा) ॥46॥
Subject
आई-वडील आणि त्यांच्या मुला-मुलींनी एकमेकाशी कसे वागावे, याविषयी -