Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 41

95 Mantra
19/41
Devata- अग्निर्देवता Rishi- वैखानस ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यत्ते॑ प॒वित्र॑म॒र्चिष्यग्ने॒ वित॑तमन्त॒रा। ब्रह्म॒ तेन॑ पुनातु मा॥४१॥

यत्। ते॒। प॒वित्र॑म्। अ॒र्चिषि॑। अग्ने॑। वित॑त॒मिति॒ विऽतत॑म्। अ॒न्त॒रा। ब्रह्म॑। तेन॑। पु॒ना॒तु॒। मा॒ ॥४१ ॥

Mantra without Swara
यत्ते पवित्रमर्चिष्यग्ने विततमन्तरा । ब्रह्म तेन पुनातु मा ॥

यत्। ते। पवित्रम्। अर्चिषि। अग्ने। विततमिति विऽततम्। अन्तरा। ब्रह्म। तेन। पुनातु। मा॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) स्वप्रकाशस्वरूप जगदीश्वरा, (ते) तुझ्या (अर्चिषि) स्वीकारणीय शुद्ध तेजोमय स्वरूपात (अन्तरा) सर्वांपेक्षा वेगळे आणि (विततम्‌) विस्तृत वा सर्वात व्यापक असे (यत्‌) जे (पवित्रम्‌) शुद्ध स्वरूप आहे आणि (ब्रह्म) जी उत्तम वेदविद्या आहे (तेन) त्या विद्येने (मा) मला आपण (पुनातु) पवित्र करा (अशी मी प्रार्थना करीत आहे) ॥41॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, (हा मंत्र तुम्हास सांगत आहे की) जो देवांचाही देव आहे, जो पवित्रांहून पवित्र असून व्याप्त पदार्थांतही जो व्यान्त आहे, असा जो अंतर्यामी परमेश्वर आहे आणि त्याने दिलेली जी वेदविद्या आहे, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा आणि त्याद्वारे निरंतर पवित्र व्हा, होत रहा ॥41॥
Subject
मनुष्यांनी कोणत्या रीतीने शुद्ध व्हावे, याविषयी -