Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 40

95 Mantra
19/40
Devata- अग्निर्देवता Rishi- वैखानस ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
प॒वित्रे॑ण पुनीहि मा॑ शु॒क्रेण॑ देव॒ दीद्य॑त्। अग्ने॒ क्रत्वा॒ क्रतूँ॒२ऽरनु॑॥४०॥

प॒वित्रे॑ण। पु॒नी॒हि॒। मा॒। शु॒क्रेण॑। दे॒व॒। दीद्य॑त्। अग्ने॑। क्रत्वा॑। क्रतू॑न्। अनु॑ ॥४० ॥

Mantra without Swara
पवित्रेण पुनीहि मा शुक्रेण देव दीद्यत् । अग्ने क्रत्वा क्रतूँरनु ॥

पवित्रेण। पुनीहि। मा। शुक्रेण। देव। दीद्यत्। अग्ने। क्रत्वा। क्रतून्। अनु॥४०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (दीद्यत्‌) प्रकाशमान (तेजस्वी) आणि (देव) विद्या देणारे (अग्ने) विद्वान महोदय, आपण (पवित्रेण) शुद्ध (निःस्वार्भी) (शुक्रेण) वीरत्व वा पराक्रमाच्या भावनेने स्वतः परिपूर्ण व्हा आणि नंतर (मा) मला (म्हणजे तुमच्या शिष्याला साधकाला) (अनु, पुनीहि) आपल्याप्रमाणे पराक्रमी व पवित्र व कर्मांना पवित्र करून नंतर माझ्या (अथवा आम्हा सर्वांच्या) (क्रतूनू) बुद्धीला आणि कर्मांना वारंवार पवित्र करीत रहा ॥40॥
Essence
भावार्थ - पिता, अध्यपक आणि उपदेशक, या सर्वांनी आधी स्वतः धार्मिक आणि विद्वान व्हावे, नंतर आपल्या संततीलाही आपल्याप्रमाणे धर्मशील आणि विद्यावान केले पाहिजे ॥40॥
Subject
पुनश्च, पुढील मंत्रातही तोच विषय -