Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 38

95 Mantra
19/38
Devata- इन्द्रो देवता Rishi- वैखानस ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अग्न॒ऽआयू॑षि पवस॒ऽआ सु॒वोर्ज॒मिषं॑ च नः। आ॒रे बा॑धस्व दु॒च्छुना॑म्॥३८॥

अग्ने॑। आयू॑षि। प॒व॒से॒। आ। सु॒व॒। ऊर्ज॑म्। इष॑म्। च॒। नः॒। आ॒रे। बा॒ध॒स्व॒। दु॒च्छुना॑म् ॥३८ ॥

Mantra without Swara
अग्न आयूँषि पवस्व आ सुवोर्जमिषञ्च नः । आरे बाधस्व दुच्छुनाम् ॥

अग्ने। आयूषि। पवसे। आ। सुव। ऊर्जम्। इषम्। च। नः। आरे। बाधस्व। दुच्छुनाम्॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान पिता, पितामह आणि प्रपितामह, आपण (नः) आम्हा (पुत्र, पौत्र, प्रपौत्र आदींच्या (आयूंषि) आयुष्याला (पवसे) पवित्र करा. (ऊर्जम्‌) पराक्रम करण्यासाठी (च) आणि (इषम्‌) इच्छापूर्तीकरिता आम्हाला आपण (आ, सुव) सर्वदिशेने, सर्वप्रकारे प्राप्त व्हा (आम्हांला प्रेरणा व उत्साह आणि आशीर्वाद द्या की ज्यायोगे आम्ही दीर्घायु होऊ) तसेच (आरे) दूर असणाऱ्या वा जवळ असराऱ्या दुष्ट (पिसाळलेल्या वा चावणाऱ्या) कुत्र्याप्रमाणे दुष्ट असणाऱ्या दुर्जनाच्या संगतीपासून आमहाला (बाधस्व) वाचवा वा दूर ठेवा ॥38॥
Essence
भावार्थ - पिता आदी (समाजातील वा घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे कर्तव्य आहे की त्यानी आपल्या संततीला (पुत्र, पौत्रादींना) दीर्घायु, पराक्रमी तसेच शुभ इच्छुक होण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यांना कुसंगतीपासून वाचवावे आणि श्रेष्ठ जनांच्या सहवासात ठेवावे. अशाप्रकारे त्याना धार्मिक आणि चिरंजीवी करावे. यामुळे ते पुत्र, पौत्रादी वृद्धावस्थेत आपल्या वृद्धजनांविषयी कदापि अप्रिय आचरण करणार नाहीत. ॥38॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय-
Footnote
(टीप- या मंत्राच्या हिंदी अनुवादात ‘आरे` हा शब्द लिहायचा राहून केला आहे. तो इथे मराठीत लिहिला आहे)