Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 37

95 Mantra
19/37
Devata- सरस्वती देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
पु॒नन्तु॑ मा पि॒तरः॑ सो॒म्यासः॑ पु॒नन्तु॑ मा पिताम॒हाः पु॒नन्तु॒ प्रपि॑तामहाः। प॒वित्रे॑ण श॒तायु॑षा। पु॒नन्तु॑ मा पिताम॒हाः पु॒नन्तु॒ प्रपि॑तामहाः। प॒वित्रे॑ण श॒तायु॑षा विश्व॒मायु॒र्व्यश्नवै॥३७॥

पु॒नन्तु॑। मा॒। पि॒तरः॑। सो॒म्यासः॑। पु॒नन्तु॑। मा॒। पि॒ता॒म॒हाः। पु॒नन्तु॑। प्रपि॑तामहा॒ इति॒ प्रऽपि॑तामहाः। प॒वित्रे॑ण। श॒तायु॒षेति॑ श॒तऽआ॑युषा। पु॒नन्तु॑। मा॒। पि॒ता॒म॒हाः। पु॒नन्तु॑। प्रपि॑तामहा॒ इति॒ प्रऽपि॑तामहाः। प॒वित्रे॑ण। श॒तायु॒षेति॑ श॒तऽआ॑युषा। विश्व॑म्। आयुः॑। वि। अ॒श्न॒वै॒ ॥३७ ॥

Mantra without Swara
पुनन्तु मा पितरः सोम्यासः पुनन्तु मा पितामहाः । पुनन्तु प्रपितामहाः पवित्रेण शतायुषा । पुनन्तु मा पितामहाः सोम्यासः पुनन्तु प्रपितामहाः । पवित्रेण शतायुषा विश्वमायुर्व्यश्नवै ॥

पुनन्तु। मा। पितरः। सोम्यासः। पुनन्तु। मा। पितामहाः। पुनन्तु। प्रपितामहा इति प्रऽपितामहाः। पवित्रेण। शतायुषेति शतऽआयुषा। पुनन्तु। मा। पितामहाः। पुनन्तु। प्रपितामहा इति प्रऽपितामहाः। पवित्रेण। शतायुषेति शतऽआयुषा। विश्वम्। आयुः। वि। अश्नवै॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक उपासक वा दीर्घायुरारोग्याची कामना करणारा साधक प्रार्थना करीत आहे. उत्तम, सदाचारयुक्त जीवन जगण्यासाठी) (सोम्यासः) ऐश्वर्यवान अथवा चंद्राप्रमाणे शांत स्वभाव असलेल्या (पितरः) ज्ञान देणाऱ्या माझे पालक पिता आदी वृद्धजन यांनी (पवित्रेण) शुद्ध, पवित्र (शतायुषा) शंभरवर्षाचे आयुष्य देऊन (मा) मला (पुनन्तु) पवित्र करावे (ही नम्र प्रार्थना) अतिबुद्धिमान तसेच चन्द्राप्रमाणे आनंददायक असलेले (पितामहाः) वडिलांचे वडील (आजोबा) यांनीही तेच अतिपवित्र असे शंभरवर्षाचे आयुष्य देऊन (मा) मला (पुनन्तु) पवित्र करावे. तसेच ऐश्वर्यवान व चंद्राप्रमाणे शीतल स्वभाव असणाऱ्या माझ्या (प्रपितामहाः) पणजोबा (आणि तत्सम वृद्धजन) यांनी (मा) मला शुद्ध शंभरवर्षाचे आयुष्य देऊन (पुनन्तु) पवित्र करावे. विद्या आदी ऐश्वर्याने समृद्ध आणि शांत स्वभावाच्या (पितामहाः) पित्यांचे पिता (आजोबा व त्यासारखे वृद्धजन) यांनी (पवित्रेण) अतीव शुद्ध आणि आनंदमय (शतायुषा) शतवर्षआयु देऊन मला (पुनन्तु) पवित्र वा सदाचारयुक्त करावे. ऐश्वर्यदाता व शांत स्वभावाच्या (प्रपितामहाः) आजोबांचे वडील यांनीही मला शंभर वर्षांचे आयुष्य देऊन (पुनन्तु) पवित्र करावे की ज्यायोगे मी (विश्वम्‌) पूर्ण (आयुः) जीवन (व्यश्नवै) प्राप्त करीन (पिता, आजोबा, पणजोबा यांच्या शुभाशीर्वादाने मी सदाचारी, पवित्र राहून शतायूषी व्हावे, अशी मी इच्छा करीत आहे ॥37॥
Essence
भावार्थ - सर्व पिता, पितामह आणि प्रपितामह (वडील, आजोबा, पणजोबा) यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुला-मुलींना (नातू, पणतू यांना) ब्रह्मचर्य-पालन करण्याचा, उत्तम विद्या ग्रहण करण्याचा धर्मोपदेश नेहमी द्यावा आणि त्यांना विद्यावान व शीलवान करावे. त्याच प्रकारे पुत्र-पुत्री आदी संततीसाठी हितकर आहे की त्यानी पिता आदींची सेवा करावी. अनुकूल आचरणाद्वारे पिता आदी वडील लोकांची नित्य सेवा करावी. अशाप्रकारे एकमेकावर उपकार करीत गृहाश्रमात सदैव आनंदात असावे. ॥37॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात विषय -