Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 35

95 Mantra
19/35
Devata- सोमो देवता Rishi- हैमवर्चिर्ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यदत्र॑ रि॒प्तꣳ र॒सिनः॑ सु॒तस्य॒ यदिन्द्रो॒ऽअपि॑ब॒च्छची॑भिः। अ॒हं तद॑स्य॒ मन॑सा शि॒वेन॒ सोम॒ꣳ राजा॑नमि॒ह भ॑क्षयामि॥३५॥

यत्। अत्र॑। रि॒प्तम्। र॒सिनः॑। सु॒तस्य॑। यत्। इन्द्रः॑। अपि॑बत्। शची॑भिः। अ॒हम्। तत्। अ॒स्य॒। मन॑सा। शि॒वेन॑। सोम॑म्। राजा॑नम्। इ॒ह। भ॒क्ष॒या॒मि॒ ॥३५ ॥

Mantra without Swara
यदत्र रिप्तँ रसिनः सुतस्य यदिन्द्रोऽअपिबच्छचीभिः । अहन्तदस्य मनसा शिवेन सोमँ राजानमिह भक्षयामि॥

यत्। अत्र। रिप्तम्। रसिनः। सुतस्य। यत्। इन्द्रः। अपिबत्। शचीभिः। अहम्। तत्। अस्य। मनसा। शिवेन। सोमम्। राजानम्। इह। भक्षयामि॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सोमआदी ओषधींचा रस पान करणारी व्यक्ती इतरांना सांगत आहे) लोकहो, ज्याप्रमाणे (अहम्‌) मी (इह) या जगात (अस्य) या (औषधीपासून) (सुतस्य) काढलेल्या (रसिनः) प्रसशंसनीय (वा उपकारक) या रसयुक्त पदार्थांचे (सेवन करतो) की ज्या पदार्थाचा (यत्‌) जो भाग (अत्र) या संसारामध्येच (रिप्तम्‌) प्राप्त आहे (म्हणजे जगात रसयुक्त अशा पुष्कळ औषधी आहेत) तसेच (इन्द्रः) सूर्य (राचिभिः) आपल्या आकर्षणयुक्त किरणांद्वारे (यत्‌) ज्या (अपिबत्‌) रसांचे सेवन करतो (सूर्यदेखील पृथ्वीवरील वनस्पतींच्या जलाचे शोषण करतो) (तत्‌) त्या बलदायी रसांचे आणि (राजानम्‌) प्रकाशमान (वा सर्व रसांमधे जो श्रेष्ठ रस त्या (सोमम्‌) सोम औषधीच्या रसाचे मी (एक लाभदारी व्यक्ती) (शिवेन) त्या कल्याणकारी रसाचे (मनसा) मनःपूर्वक (पूर्ण आनंद गेत) (भक्षयामि) भक्षण करतो आणि पितो. हे मनुष्यांनो, तुम्हीही माझ्याप्रमाणे भक्षण करा आणि पान करा ॥35॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी पृथ्वीवरील जलाचे आकर्षण करतो व नंतर वृष्टीद्वारे तेच जल पुन्हा पृथ्वीवर वर्णित करून सर्वांना सुखी करतो, त्याप्रमाणे तुम्हीदेखील (रसयुक्त पदार्थांवर) अनुकूल प्रक्रिया करून रस निष्पादित करा व त्याचे सेवन करा. याप्रमाणे आपली शक्ती, कीर्ती वाढवीत (सर्वांनाही ते रस देत) सर्वांना सुखी व आनंदित करा ॥35॥
Subject
मनुष्यांनी सर्वांना आनन्दित केले पाहिजे, याविषयी -