Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 33

95 Mantra
19/33
Devata- इन्द्रो देवता Rishi- हैमवर्चिर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यस्ते॒ रसः॒ सम्भृ॑त॒ऽओष॑धीषु॒ सोम॑स्य शुष्मः॒ सुर॑या सु॒तस्य॑। तेन॑ जिन्व॒ यज॑मानं॒ मदे॑न॒ सर॑स्वतीम॒श्विना॒विन्द्र॑म॒ग्निम्॥३३॥

यः। ते॒। रसः॑। सम्भृ॑त॒ इति॒ सम्ऽभृ॑तः। ओष॑धीषु। सोम॑स्य। शुष्मः॑। सुर॑या। सु॒तस्य॑। तेन॑। जि॒न्व॒। यज॑मानम्। मदे॑न। सर॑स्वतीम्। अ॒श्विनौ॑। इन्द्र॑म्। अ॒ग्निम् ॥३३ ॥

Mantra without Swara
यस्ते रसः सम्भृत ओषधीषु सोमस्य शुष्मः सुरया सुतस्य । तेन जिन्व यजमानम्मदेन सरस्वतीमश्विनाविन्द्रमग्निम् ॥

यः। ते। रसः। सम्भृत इति सम्ऽभृतः। ओषधीषु। सोमस्य। शुष्मः। सुरया। सुतस्य। तेन। जिन्व। यजमानम्। मदेन। सरस्वतीम्। अश्विनौ। इन्द्रम्। अग्निम्॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, (यः) जो (ते) आपण (ओषधीषु) सोमलता आदी औषधींमधून (सुतस्य) काढलेला आणि (सोमस्य) अंशुमान आदी चोवीस प्रकारच्या सोम वनस्पतीतून निष्पादित केलेला आणि (सुरया) उत्तम दानशीला स्त्रीद्वारे (सम्भृतः) व्यवस्थितपणे धारण केलेला (सांभाळून ठेवलेला) (शुष्मः) बलदायी (रसः) रस आहे, (तेन) त्या (मदेन) आनंददायी रसाने आपण (यजमानम्‌) सर्वांना सुख देणाऱ्या यजमानाला (प्रसन्न करा) तसेच (सरस्वतीम्‌) उत्तम विद्यायुक्त स्त्रीला आणि (अश्विनौ) विद्यावान अध्यापकाला व उपदेशाला (प्रसन्न करा) याशिवाय आपण (इन्द्रम्‌) ऐश्वर्यशाली सभापतीला अथवा सैन्याधीशाला तसेच (अग्निम्‌) अग्नीप्रमाणे शत्रूला जाळणाऱ्या योद्धावीराला (हा सोमरस देऊन) त्या सर्वांना (जिन्व) आनंदित करा ॥33॥
Essence
भावार्थ - औषधीशास्त्राचे विद्वान जे ज्ञाते महौषधीचे सार काढून स्वतः सेवन करतात आणि अन्यजनांनादेखील सेवन करण्यासाठी देतात आणि अशाप्रकारे सर्वांच्या मनात आनंदाची वृद्धी करतात, ते निश्चयाने धन्यवादासाठी पात्र आहेत (आम्ही त्या औषधास्त्राच्या विद्वानांना धन्यवाद देतो.) ॥33॥
Subject
कशी माणसें धन्यवादास पात्र आहेत, या विषयी -