Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 29

95 Mantra
19/29
Devata- इडा देवता Rishi- हैमवर्चिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इडा॑भिर्भ॒क्षाना॑प्नोति सूक्तवा॒केना॒शिषः॑। शं॒युना॑ पत्नीसंया॒जान्त्स॑मिष्टय॒जुषा॑ स॒ꣳस्थाम्॥२९॥

इडा॑भिः। भ॒क्षान्। आ॒प्नो॒ति॒। सू॒क्त॒वा॒केनेति॑ सूक्तऽवा॒केन॑। आ॒शिष॒ इत्या॒ऽशिषः॑। शं॒युनेति॑ श॒म्ऽयुना॑। प॒त्नी॒सं॒या॒जानिति॑ पत्नीऽसंया॒जान्। स॒मि॒ष्ट॒य॒जुषेति॑ समिष्टऽय॒जुषा॑। स॒ꣳस्थामिति॑ स॒म्ऽस्थाम् ॥२९ ॥

Mantra without Swara
इडाभिर्भक्षानाप्नोति सूक्तवाकेनाशिषः । शम्युना पत्नीसँयाजान्त्समिष्टयजुषा सँस्थाम् ॥

इडाभिः। भक्षान्। आप्नोति। सूक्तवाकेनेति सूक्तऽवाकेन। आशिष इत्याऽशिषः। शंयुनेति शम्ऽयुना। पत्नीसंयाजानिति पत्नीऽसंयाजान्। समिष्टयजुषेति समिष्टऽयजुषा। सꣳस्थामिति सम्ऽस्थाम्॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे विद्वान गण, (इडाभिः) पृथ्वी पासून (वा पृथ्वीच्या अनेक भागापासून) भक्षान्‌) भक्षणास योग्य अशा अन्न (फळ, कंद, शाक आदी पदार्थ) प्राप्त करतात, तसेच (सूक्तवाकेन) सुंदर मोहक पद्धतीच्या संभाषणाद्वारे (आशिषः) इच्छित पदार्थ प्राप्त करतात (ते सुखी होतात) तसेच जे विद्वान (शंयुना) सुखदायक आचरणाद्वारे (पत्नीसंयाजान्‌) पत्नीजवळ प्रेमाने राहतात, तसेच (समिष्टयजुषा) वांछित फळाची प्राप्ती करून देणाऱ्या यजुवेदोक्त कार्माद्वारे (संस्थाम्‌) निवासासाठी चांगली घरें (आप्नोति) प्राप्त करतात ते सुखी का होणार नाहीत (अर्थात लक्षणयोग्य अन्न सेवन करणारे, प्रेरक संभाषण करणारे, पत्नीशी प्रेमळ व्यवहार करणारे आणि यजुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने कर्म करतात, ते लोक अवश्य सुखी होतात) ॥29॥
Essence
भावार्थ - गृहस्थजनांनी वेदविज्ञान जाणून घेऊन त्याद्वारेच समस्त पृथ्वीचे राज्य प्राप्त करण्याची इच्छा करावी (याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही.) ॥29॥
Subject
गृहस्थजनांनी काय केले पाहिजे, याविषयी -