Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 22

95 Mantra
19/22
Devata- यज्ञो देवता Rishi- हैमवर्चिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
धा॒नाना॑ रू॒पं कुव॑लं परीवा॒पस्य॑ गो॒धूमाः॑। सक्तू॑ना रू॒पं बदर॑मुप॒वाकाः॑। कर॒म्भस्य॑॥२२॥

धा॒नाना॑म्। रू॒पम्। कुव॑लम्। प॒री॒वा॒पस्य॑। प॒री॒वा॒पस्येति॑ परिऽवा॒पस्य॑। गो॒धूमाः॑। सक्तू॑नाम्। रू॒पम्। बद॑रम्। उ॒प॒वाका॒ इत्यु॑प॒ऽवाकाः॑। क॒र॒म्भस्य॑ ॥२२ ॥

Mantra without Swara
धानानाँ रूपङ्कुवलम्परीवापस्य गोधूमाः । सक्तूनाँ रूपम्बदरमुपवाकाः करम्भस्य ॥

धानानाम्। रूपम्। कुवलम्। परीवापस्य। परीवापस्येति परिऽवापस्य। गोधूमाः। सक्तूनाम्। रूपम्। बदरम्। उपवाका इत्युपऽवाकाः। करम्भस्य॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे मनुष्यांनो, तुम्ही (धानानाम्‌) जव आदी भाजलेल्या धान्याचे, तसेच (कुवलम्‌) ताजे कोमल बोर फळासारखे रूप म्हणजे आकर्षक व स्वादिष्ट चव आहे, (त्याचा उपभोग करा) तसेच (परीवापस्य) धान्याचे जे दळलेले रूप म्हणजे पीठ आहे, त्या (गोधूमाः) गहू धान्याचे (रूपम्‌) रूप वा गुण ओळखा. तसेच (सक्तूनाम्‌) सातूचे जे (बदरम्‌) बदरी फळासारखे मधुर व स्वादिष्ट रूप आहे त्याचे म्हणजे सातूचे (करम्भस्य) दही मिसळलेल्या रूपात सेवन करा (उपवाकाः) तुमच्याजवळ असलेल्या या धान्याचे (रूपम्‌) रूप (म्हणजे भाजलेले जव, दळलेले गहू, तयार सातू, हे आपल्या घरात नेहमी जवळ ठेवा, कारण हे धान्य बोरफळाप्रमाणे, पुष्टिकर आहेत) ॥22॥
Essence
भावार्थ - जे लोक सर्व भोज्यखाद्य धान्याला स्वच्छ करून त्या पासून तयार केलेले अन्न सेवन करतात व इतरांना सेवन करवितात, ते नीरोग असतात ॥22॥
Subject
कोणती माणसें नीरोगी राहतात, याविषयी -