Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 15

95 Mantra
19/15
Devata- सोमो देवता Rishi- हैमवर्चिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सोम॑स्य रू॒पं क्री॒तस्य॑ परि॒स्रुत्परि॑षिच्यते। अ॒श्विभ्यां॑ दु॒ग्धं भे॑ष॒जमिन्द्रा॑यै॒न्द्रꣳ सर॑स्वत्या॥१५॥

सोम॑स्य। रू॒पम्। क्री॒तस्य॑। प॒रि॒स्रुदिति॑ परि॒ऽस्रुत्। परि॑। सि॒च्य॒ते॒। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। दु॒ग्धम्। भे॒ष॒जम्। इन्द्रा॑य। ऐ॒न्द्रम्। सर॑स्वत्या ॥१५ ॥

Mantra without Swara
सोमस्य रूपङ्क्रीतस्य परिस्रुत्परि षिच्यते । अश्विभ्यां दुद्ग्धं भेषजमिन्द्रायैन्द्रँ सरस्वत्या ॥

सोमस्य। रूपम्। क्रीतस्य। परिस्रुदिति परिऽस्रुत्। परि। सिच्यते। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। दुग्धम्। भेषजम्। इन्द्राय। ऐन्द्रम्। सरस्वत्या॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे स्त्रियांनो (कुमारिकांनो), (सरस्वत्या) औषधिविज्ञानाची संपूर्ण माहिती असणाऱ्या विदुषी स्त्रीकडून (क्रीतस्य) घेतलेल्या आणि (सोमस्य) सोम आदी औषधीपासून (परिस्रुत्‌) मिळणाऱ्या रसाचा (ज्याप्रमाणे लोक सेवन करतात) तसेच त्यापासून (रूपम्‌) सुंदर रूप धारण करतात (तसे तुम्हीही करा) तसेच (अश्विभ्याम्‌) वैदिक विद्येत वा आयुर्वेदशास्त्रात प्रवीण अशा दोन विद्वानांद्वारा (दुग्धम्‌) दोहन केलेले (पिळून वा रगडून काढलेले) (भेषजम्‌) औषधीरूप दूध तुम्ही ग्रहण करा. याशिवाय ज्याप्रमाणे (इन्द्रम) विद्वान लोक ऐश्वर्याची इच्छा करणाऱ्या व्यक्तीसाठी (ऐन्द्रम्‌) विद्युत विषयीचे विशिष्ट ज्ञान (तज्ञलोक) (परिषिच्यते) सर्वदृष्ट्या पूर्णपणे प्राप्त करतात, तद्वत तसे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, हे कुमारिकांनो, तुम्हीदेखील यत्न करीत जा. त्यांच्याप्रमाणे आचरण करीत जा ॥15॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सर्व कुमारी कन्यांना उचित आहे की त्यानी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करीत व्याकरणशास्त्र, धर्मविद्या आणि आयुर्वेद आदी शास्त्रांचे अध्ययन करून स्वयंवर पद्धतीने विवाह करावा. तसेच औषधींविषयी ज्ञान प्राप्त करून. आणि वरण, कढी आदी भोज्य पदार्थ तयार करण्याच्या पद्धती शिकून घ्याव्यात. अन्नाला उत्तम रसांनी युक्त करून, पतीला आणि घरातील सर्वांना जेवण वाढावे नंतर स्वतः देखील जेवण करून शरीरातील शक्ती, आरोग्यादीची वृद्धी करावी ॥15॥
Subject
कुमारिकांनी काम केले पाहिजे (त्यांची कर्तव्यें काय?) याविषयी -