Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 14

95 Mantra
19/14
Devata- आतिथ्यादयो लिङ्गोक्ता देवताः Rishi- हैमवर्चिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
आ॒ति॒थ्य॒रू॒पं मास॑रं महावी॒रस्य॑ न॒ग्नहुः॑। रू॒पमु॑प॒सदा॑मे॒तत्ति॒स्रो रात्रीः॒ सुरासु॑ता॥१४॥

आ॒ति॒थ्य॒रू॒पमित्या॑तिथ्यऽरू॒पम्। मास॑रम्। म॒हा॒वी॒रस्येति॑ महाऽवी॒रस्य॑। न॒ग्नहुः॑। रू॒पम्। उ॒प॒सदा॒मित्यु॑प॒ऽसदा॑म्। ए॒तत्। ति॒स्रः। रात्रीः॑। सुरा॑। आसु॒तेत्याऽसु॑ता ॥१४ ॥

Mantra without Swara
आतिथ्यरूपम्मासरम्महावीरस्य नग्नहुः । रूपमुपसदामेतत्तिस्रो रात्रीः सुरासुता ॥

आतिथ्यरूपमित्यातिथ्यऽरूपम्। मासरम्। महावीरस्येति महाऽवीरस्य। नग्नहुः। रूपम्। उपसदामित्युपऽसदाम्। एतत्। तिस्रः। रात्रीः। सुरा। आसुतेत्याऽसुता॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (आतिथ्यभावनेने भारलेला एक गृहस्थ घरी आलेल्या अतिथिगणाना उद्देशून म्हणत आहे, या मंत्राचा असा प्रसंग कल्पित करता येतो) गृहस्थ म्हणत आहे - हे मनुष्यांनो (घरी झालेल्या पाहुण्यांनो) (मासरम्‌) ज्या महिन्यात अतिथिजन सर्वत्र रमण करतात (विशेषतः वर्षा ऋतूनंतर शरद वा हेमंत ऋतूत) त्या महिन्यात (आतिथ्यरूपम्‌) आतिथ्यरूप धर्माचे (मी पालन करीत आहे) (घरी येणाऱ्या पाहुण्यांमधे (महावीरस्य) महान वीरजन किंवा (नग्नहुः) नग्न (अति निर्धन, अकिंचन) जन असोत, (कोणत्याही (रूपम्‌) रूपधारी माणूस (उपसदाम्‌) घराजवळ येऊन भोजन वा इतर आतिथ्यधर्म पालनासाठी थांबत असलेल्या अतिथीजनांचा (मी) (तिस्रः) तीन (रात्रीः) रात्रीपर्यंत (निवासाची व्यवस्था करतो) (माझ्या घरी आलेले आपण सर्व अतिथीजनांना विनंती की) (एतत्‌) आपणांसाठी आणलेल्या या पदार्थांना वा (आसुता) सर्व उत्कृष्ट प्रकारे तयार केलेला हा (सुस) सोमरस आपण ग्रहण करा. ॥14॥
Essence
भावार्थ - जे गृहस्थजन वा जे मनुष्य, धार्मिक विद्वानांचा सत्कार करतात, त्यांच्या संगतीत राहण्याची इच्छा करतात आणि इतरांना सदुपदेश करतात, ते कीर्तिमंत होतात. तसेच जे वीरांचा सन्मान करतात, दीन-दरिद्रजनांना वस्त्रादी पदार्थ दान करतात, आपल्या सेवकांच्या निवासादीची सोय करतात आणि अतिथिगणासाठी सोमरस (सारख्या उत्तम स्वास्थकारक रसांचे उत्पादन वा निर्मिती करतात,) ते गृहस्थीजन कीर्तिमंत होतात. ॥14॥
Subject
कोणती वा कशा प्रकारची माणसें कीर्तिमान होतात, याविषयी -