Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 11

95 Mantra
19/11
Devata- अग्निर्देवता Rishi- हैमवर्चिर्ऋषिः Chhand- शक्वरी Swara- धैवतः
Mantra with Swara
यदा॑पि॒पेष॑ मा॒तरं॑ पु॒त्रः प्रमु॑दितो॒ धय॑न्। ए॒तत्तद॑ग्नेऽअनृ॒णो भ॑वा॒म्यह॑तौ पि॒तरौ॒ मया॑। स॒म्पृच॑ स्थ॒ सं मा॑ भ॒द्रेण॑ पृङ्क्त वि॒पृच॑ स्थ॒ वि मा॑ पा॒प्मना॑ पृङ्क्त॥११॥

यत्। आ॒पि॒पेषेत्या॑ऽपि॒पेष॑। मा॒तर॑म्। पु॒त्रः। प्रमु॑दित॒ इति॒ प्रऽमु॑दितः। धय॑न्। ए॒तत्। तत्। अ॒ग्ने॒। अ॒नृ॒णः। भ॒वा॒मि॒। अह॑तौ। पि॒तरौ॑। मया॑। स॒म्पृच॒ इति॒ स॒म्ऽपृचः॑। स्थ॒। सम्। मा॒। भ॒द्रेण॑। पृ॒ङ्क्त॒। वि॒पृच॒ इति॑ वि॒ऽपृचः॑। स्थ॒। वि। मा॒। पा॒प्मना॑। पृ॒ङ्क्त॒ ॥११ ॥

Mantra without Swara
यदापिपेष मातरम्पुत्रः प्रमुदितो धयन् । एतत्तदग्नेऽअनृणो भवाम्यहतौ पितरौ मया । सम्पृच स्थ सम्मा भद्रेण पृङ्क्त विपृच स्थ वि मा पाप्मना पृङ्क्त ॥

यत्। आपिपेषेत्याऽपिपेष। मातरम्। पुत्रः। प्रमुदित इति प्रऽमुदितः। धयन्। एतत्। तत्। अग्ने। अनृणः। भवामि। अहतौ। पितरौ। मया। सम्पृच इति सम्ऽपृचः। स्थ। सम्। मा। भद्रेण। पृङ्क्त। विपृच इति विऽपृचः। स्थ। वि। मा। पाप्मना। पृङ्क्त॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (कोणी सद्‌गृहस्थ गृहाश्रमी व्यक्ती विद्वानास म्हणत आहे) हे (अग्ने) विद्वान, (यत्‌) जो (प्रमुदतः) अत्यंत हर्षित (पुत्रः) पुत्र (आपल्या आईचे) (धयन्‌) दुग्धपान करीत (मातरम्‌) आईला (आपिपेष) सर्वप्रकारे त्रास देतो (आईचे स्तन दाबणें, मांडीवरच हात-पाय हालविणे दंगामस्ती करणे आदी क्रिया केल्यामुळे तान्हे मूल आईला जरी त्रास देत असेल, तरी पण तो त्रास आईला अत्यंत प्रिय वाटतो) अशा त्या पुत्राकडून मी (एक संसारी पिता) (अनृणः) ऋणरहित (भवामि) होत आहे (एक पिता म्हणून पुत्राच्या पालन रूप कर्तव्य करून त्या ऋणातून मुक्त होत आहे) यामुळे माझे (पितरौ) माता-पिता) (अहतौ) कोणत्या प्रकारच्या विघ्न वा दुःखापासून दूर राहतील आणि (मया) माझ्यासह (भद्रेण) कल्याणयुक्त (सुखी, आनंदी) राहतील. हे मनुष्यानो (माझ्या समाज बांधवांनो), मला (सं, पृङ्क्त) कल्याणाशी संबद्ध करा (माझे कल्याण होऊ द्या) तुम्ही (पाप्मना) पापकर्मापासून (विपृचः) वेगळे वा दूर राहणारे (स्थ) व्हा आणि (मा) मलादेखील कोणत्याही पापापासून (पि, पृङ्क्त) दूर ठेवा. अशाप्रकारे तुम्ही (तदेवत्‌) पर जन्मात आणि या जन्मात सुख प्राप्त करा (माझे कल्याणामुळे तुमचेही कल्याण होईल आणि तुम्ही-आम्ही दोघे पापमुक्त राहू या) ॥11॥
Essence
भावार्थ - जसे आईवडील मुलाचे पालन करतात, तसे मुलांनी आईवडिलांच्या म्हातारपणी आईवडिलांची सेवा केली पाहिजे. सर्व मनुष्यांचे कर्तव्य आहे तसेच प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की माता-पित्याची यथोचित सेवा अवश्य करावी आणि त्याद्वारे पितृ ऋणापासून मुक्त व्हावे. ज्याप्रमाणे विद्यावान धार्मिक माता-पित्यानी आपल्या मुला-मुलींना पापाचरणापासून दूर ठेऊन त्याना धर्माचरणाकडे प्रवृत्त करावे ॥11॥
Subject
मुला-मुलींनी आपल्या आईवडिलांशी कसे वागावे, याविषयी -